यंदा पावसाने पाठ फिरवल्याने बळिराजा चिंतेत आहे. डोक्यावर असलेले कर्ज फेडायचे कसे? याची चिंता शेतकऱ्याला सतावत आहे. एकीकडे नापिक आणि दुसरीकडे कर्ज फेडण्यासाठी बँकेने नोटीस पाठवल्याने कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हयातील पैठण कुतुबखेडा येथे 43 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. नारायण भाऊसाहेब करंगळ असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
बँकेकडून घेतलेले 7 लाख रुपयांचे कर्ज भरण्यायासाठी त्यांना नोटीस आली होती. आधीच नापिकी आणि आता नोटीस आल्यामुळे कर्जाची परतफेड करायची कशी याचीच चिंता त्यांना सतावत होती. नारायण करंगळ हे रविवारी (१०, डिसेंबर) शेतात गेले आणि शेतातून घरी आल्यानंतर त्यांनी शेतातच विष प्राशन केल्याचे त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
माहिती मिळताच नातेवाइकांच्या मदतीने पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे यांनी त्यांना तपासून मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरिक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. (latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.