मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे खोटं बोलत आहेत. २०१९ मध्ये भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. ते साधं चर्चेसाठी देखील तयार नव्हते. उदय सामंत यांना पक्षांतराचा अनुभव आहे. मात्र त्यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या जर सरकार पडलं तर उदय सामंत आमच्याकडे असतील. पण आम्ही त्यांना घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत सत्तेत राहायचं असं त्यांचं गणित आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं पूर्णपणे खोटं आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुरू आहे. हिवाळी अधिवेशनामुळे सुनावणी नागपूरात होतेय. आज ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांची उलट तपासणी घेतली गेली. यावेळी प्रश्नांना उत्तरं देताना "उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत सत्ता स्थापन करु असे आश्वासन दिले होते", असा मोठा गौप्यस्फोट सामंत यांनी केला, त्यांच्या याच वक्तव्यास संजय राऊतांनी (Sanjay Raut) जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करायला अजित पवार यांचा विरोध
एकनाथ शिंदे यांना जर त्यावेळी सरकारमध्ये मुख्यमंत्री केलं असतं तर ते झाले असते. मात्र त्यावेळी त्यांची वेगळी भूमिका होती आणि आता वेगळी भूमिका आहे. महाविकास आघाडी बनत असताना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करायला अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांचा विरोध होता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत राऊतांनी मोठा दावा केलाय.
नाशिकमधल्या एका मंत्र्याला ५० लाख रुपये मिळत होते
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी ललित पाटील प्रकरणावरून सरकारवर काही गंभीर आरोपही केलेत. ललित पाटील प्रकरणात पोलिसांना सर्व तपास माहिती आहे. हे फार मोठे रॅकेट आहे. नाशिक पोलिसांकडे याप्रकरणी मोठी यादी आहे. भाजप आणि इतर राजकारण्यांना हफ्ते जात होते. नाशिकमधल्या एका मंत्र्याला ५० लाख रुपये मिळत होते, असा आरोप यावेळी राऊतांनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.