Chhatrapati Sambhajinagar Saan Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये मद्यपी कारचालकाचा धुमाकूळ; भरधाव गाडी चालवत दुचाकींचा चुराडा, अपघातानंतर ठोकली धूम, VIDEO

Drunk Driver Heat 4 bikes 6 Tables: मद्यपी कारचालक तरुणाचा धूमाकूळ छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला आहे. या तरूणाने भरधाव वेगात गाडी चालवत चार दुचाकी आणि सहा टेबल ओट्यांचा चुराडा केला आहे.

Rohini Gudaghe

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर भागात एका मद्यपी कारचालक तरुणाने भरधाव कार चालवत धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं आहे. पुण्यातील अपघाताची आठवण करून देणारा भयानक प्रसंग यावेळी घडला. यामध्ये कार चालकाने बेफाम कार चालवत चार दुचाकी आणि सहा टेबल आणि हॉटेलच्या ओट्याचा चुराडा केलाय. शिवाय त्याच्या कारचंही मोठं नुकसान झालं आहे.

या मद्यपी कारचालकाने हे सगळे कृत्य करून कारच्या दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट तोडून घटनास्थळावरून पोबारा केला. यानंतर घटनास्थळावर नागरिकांचा मोठा जमाव गोळा झाला. कारचालक नशेत असल्याचचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची पुनरावृत्ती छत्रपती संभाजीनगरमध्ये होण्यापासून थोडक्यात ही घटना टळली आहे. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल (Chhatrapati Sambhajinagar) झाले. त्यांनी कारची झाडाझडती घेतली, तेव्हा या कारमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा गमच्या आणि इतर काही दस्तऐवज मिळून आले. त्यावरून या कारचालकाची ओळख पटविण्याचं काम सध्या सुरू (Chhatrapati Sambhajinagar News) आहे.

नागपूर कोराडी मार्गावर भरधाव कारने ऑटोला मागून धडक दिल्याने अकराजण जखमी झाले आहेत. कोरडी प्लांट वसाहतजवळ संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अपघात घडला (Drunk Driver Heat 4 bikes) आहे. या अकराजणांमध्ये पाच महिला तर पाच मुलांचा समावेश होता. या दोन महिला गंभीर जखमी आहेत. सहाजणांना किरकोळ दुखापतीवर उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

दोन महिलांवर खासगी रुग्णालयात तर दोघींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऑटो चालकाला दुखापत झाली होती. या अपघातात ऑटोचंही मोठं नुकसान झालं आहे . या कारचालकाला अटक करण्यात आली (Car Auto Accident) आहे. कारचालक मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलिसांची कारवाई उशिरापर्यंत सुरू असल्याने आरोपीचे नाव अद्याव कळू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT