Samruddhi Highway Accident: समृध्दी महामार्गावर भीषण अपघात; वैजापूरजवळ कार ट्रकला धडकली, तिघांचा जागीच मृत्यू

Chhatrapati Sambhaji Nagar Accident: समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात कार आणि ट्रकचा अपघात झाला. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय.
Samrudhi Highway Accident: समृध्दी महामार्गावर भीषण अपघात; वैजापूरजवळ कार ट्रकला धडकली तिघांचा जागीच मृत्यू
Chhatrapati Sambhaji Nagar AccidentSaam TV

छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. कारने ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात ३ जण ठार झालेत. तर ४ गंभीर जखमी झालेत. कुमारी योगेश जाधव वय २२ वर्षे,कमला बन्सी राठोड वय ४० वर्षे, बन्सी धोंडीराम राठोड वय ४५ वर्षे (सर्व रा.जांभळी तांडा बीडकिन) असे या घटनेतील तिघा मयातांची नावे आहेत.

तर या अपघातात रामसिंग बलसिंग राठोड वय ३० वर्षे, शीतल वनसिंग राठोड वय २४,मयंक योगेश जाधव वय २ व नेहा बनसिंग राठोड वय २७ वर्षे हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर कारचे एक्सेल हे घटनास्थळावरून जवळपास एक ते दीड किलोमीटर दूर लांबपर्यंत गेले होतं.

समृध्दी महामार्गावर पुन्हा अपघात महामार्गावरील दुभाजकाला धडकली कार

शिर्डी येथील साईबाबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकाच्या कारचा अपघात झाला. समृद्धी महामार्गावर दुसरा अपघात झालाय. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील पोहा परिसरातील लोकेशन १७५ वर मुंबई कॉरिडोरवर कारचा समोरचा टायर फुटला. त्यानंतर कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकली होती. या अपघातात दोनजण गंभीर तर एक किरकोळ जखमी झालेत.

उभ्या ट्रकला भरधाव कारची धडक; ३ जण जागीच ठार

वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर कारने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली आहे. या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला काही दिवसांपूर्वी घडली होती. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील रिधोरा इंटरचेंजजवळ हा अपघात झाला होता.

Samrudhi Highway Accident: समृध्दी महामार्गावर भीषण अपघात; वैजापूरजवळ कार ट्रकला धडकली तिघांचा जागीच मृत्यू
Pune Porsche Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण; शिवानी अग्रवालला रक्त बदलण्याचा सल्ला कोणी दिला? धक्कादायक माहिती समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com