Chhatrapati Sambhajinagar Breaking News:  Saamtv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: रुग्णवाहिका न मिळाल्याने रस्त्यात प्रसुती, उपचाराअभावी नवजात बाळाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक घटना

Chhatrapati Sambhajinagar Breaking News: उपचाराअभावी रस्त्यावर प्रसूती झालेल्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली.

Gangappa Pujari

रामू ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता.२७ एप्रिल २०२४

उपचाराअभावी रस्त्यावर प्रसूती झालेल्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली. गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशनमध्ये या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामधील लासुर स्टेशन येथे एका आदिवासी महिलेची रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने भर रस्त्यामध्येच प्रसूती झाली. मात्र उपचाराअभावी नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर आणि कर्मचारी गैरहजर असल्याने बाळ दगावल्याची प्राथमिक माहिती आहे. सोबतच या महिलेला पुढील उपचारासाठी संभाजीनगरला हलवण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी या नवजात अर्भकला झाडाला बांधून ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली. यातच बालकाचा मृत्यू झाला.

दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच गंगापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या बेरजबाबदारपणामुळेच कोणतीही सेवा मिळाली नाही शिवाय रुग्णवाहिका वेळेवर आली नसल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

SCROLL FOR NEXT