Chhatrapati Sambhajinagar News: Saamtv
महाराष्ट्र

Chhatrapati SambhajiNagar : अभ्यासावरून वडील रागावले; ७ वीच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

Chhatrapati Sambhajinagar News: वडिल बाहेर गेल्यानंतर घराच्या लाकडी दांड्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेत प्रणवीने आत्महत्या केली.

माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar News:

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभ्यास करण्यावरून वडील रागावल्याने सातवीत शिकणाऱ्या मुलीने आत्मकेल्याची घटना संभाजीनगरच्या औरंगपुरा भागात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

छोट्या छोट्या गोष्टींवरुन लहान मुले टोकाची पाऊले उचलत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अभ्यासावरुन रागावल्याने, मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुले मुली थेट आत्महत्येसारखा मार्ग निवडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशीच एक हादरवुन टाकणारी घटना घडली आहे.

अभ्यास करण्यावरून वडील रागावल्याने मुलीने आत्महत्या केल्याची घटना औरंगपुरा भागातील भागातील भडाई गल्लीत मंगळवारी (१७, ऑक्टोंबर) ही घटना घडली. शाळेचा होमवर्क केला नाही म्हणून वडील रागवल्याने सातवीत शिकणाऱ्या बारा वर्षीय प्रणवी उलमाले या विद्यार्थिनीने घरातच गळफास घेऊन आयुष्य संपवले.

प्रणवी वेळेवर अभ्यास करत नसल्याने शिक्षकांनी तशी नोंद तिच्या नोंदवहीमध्ये केली होती. ती बघून वडिलांनी होमवर्क वेळेवर करत जा.. म्हणून रागावले आणि त्यानंतर ते कामावर निघून गेले. याच रागाच्या भरातून वडिल गेल्यानंतर घराच्या लाकडी दांड्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेत प्रणवीने आत्महत्या केली.

बराच वेळेपासून ती खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने, आजोबांनी दरवाजा तोडला आणि आज प्रवेश केला असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. क्रांती चौक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women’s World Cup 2025: महिला वर्ल्ड कप विजेत्या टीमला टाटा मोटर्सकडून मोठ्ठं गिफ्ट; प्रत्येक खेळाडूला मिळणार नवी Tata Sierra SUV

Maharashtra Live News Update: फलटण प्रकरणात तिसरा मोठा दणका, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली

Central Railway Accident : मध्य रेल्वेवर भीषण अपघात; आंदोलनामुळे गर्दी, लोकलमधून पडून ३ प्रवाशांचा मृत्यू

Prajakta Mali Education: जुळून येती रेशीमगाठी फेम मेघना किती शिकलीये?

दोन सिलिंडरचा स्फोट आणि संपूर्ण इमारतीला आग; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT