Chhatrapati Sambhajinagar News Saam
महाराष्ट्र

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Chaos at Vetalwadi Fort: वेताळवाडी किल्ल्यावर पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे पंचधातूची तोफ कोसळली. घटनेत एका तरुणाचा पाय दबला जाऊन तो जखमी झाला. पुरातन तोफेचे नुकसान झाल्याने पुरातत्त्व विभागाने गंभीर दखल घेतली.

Bhagyashree Kamble

  • वेताळवाडी किल्ल्यावर पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे पंचधातूची तोफ कोसळली.

  • घटनेत एका तरुणाचा पाय दबला जाऊन तो जखमी झाला.

  • पुरातन तोफेचे नुकसान झाल्याने पुरातत्त्व विभागाने गंभीर दखल घेतली.

  • अज्ञात टोळक्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी किल्ल्यावर तरूणांच्या टोळक्यांनी हुल्लडबाजी केली. या गोंधळादरम्यान किल्ल्यावर असलेली पंचधातूची पुरातन तोफ कोसळली. यात एका तरुणाचा पाय दबला गेला, यात तो जखमी झाला. घटनेत ऐतिहासिक तोफेचेही नुकसान झाले आहे. हा प्रकार गुरुवारी (४ सप्टेंबर) सायंकाळी घडला. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सोयगाव तालुक्यातील अंबईघाटजवळील डोंगरमाथ्यावर असलेला सुंदर असा वेताळवाडी किल्ला पाहण्यासाठी तरुणांचं टोळकं आलं होतं. सुरुवातीपासूनच तरुणांनी गोंधळ घालत हुल्लडबाजी केली होती. फोटो काढत असताना तोफेजवळ ढकलाढकली झाली आणि पंचधातूची तोफ खाली कोसळली.

यात एका तरुणाचा पाय दबल्याने तो तरुण जखमी झाला. तरी या घटनेत पुरातन तोफेचं नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पुरातत्त्व विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान हा प्रकार हुल्लडबाजीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. विभागाने घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांत तक्रार दाखल केली.

घटनेचे गांभीरे लक्षात घेता पोलिसांनी अज्ञात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन आरेकर यांच्यासह अजय कोळी,गजानन दांडगे यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पंकज बारवाल करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पूर ओसरला, पण शेतकऱ्यांच्या ओल्या स्वप्नांचा चिखल कायम

Relationship Tips: नात्यात 'या' चुका वारंवार करताय? तर नातं जास्त काळ टिकणार नाही

Asia Cup 2025 नंतर स्टार खेळाडूला गंभीर दुखापत; संघाला मोठा धक्का, क्रिकेट बोर्डाची माहिती

Vijayadashami: सरन्यायाधीशांच्या आईंना RSSचं निमंत्रण, आंबेडकरी चळवळीशी RSSची जवळीक

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू;भाजप प्रवक्त्याची उघड धमकी

SCROLL FOR NEXT