Abdul Sattar vs BJP Sillod Political News  Saam TV
महाराष्ट्र

Abdul Sattar vs BJP : अब्दुल सत्तारांविरोधात भाजप पदाधिकारी एकवटले; आज सिल्लोड बंदची हाक

Abdul Sattar vs BJP Sillod Political News : छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात पुन्हा भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

Satish Daud

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात पुन्हा भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. सत्तारांना घेण्यासाठी भाजपकडून आज सिल्लोडमध्ये मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. यापार्श्वभूमीवर आज सोमवारी सिल्लोड बंदची हाक देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे. भाजपचे नेते तसेच पदाधिकारी सत्तार यांच्यावर सातत्याने टीका करीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

पंधरा दिवसांपूर्वी शिवना येथील प्रकरणावरून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने अजिंठा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी दानवे यांनी सत्तारांवर चांगलेच तोडसुख घेतले होते. पोलिसांच्या बळाचा वापर करून शिवना येथे घडलेल्या घटनेत सत्तारांनी जाणीवपूर्वक भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप दानवे यांनी केला.

इतकंच नाही, तर अब्दुल सत्तार यांच्यामुळे सिल्लोडचा पाकिस्तान होतोय, अशी जहरी टीका देखील रावसाहेब दानवे यांनी केली होती.आता सत्तार यांच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने पुन्हा सिल्लोडमध्ये मोर्चा काढला जाणार आहे. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत होणार आहे. या मोर्चामध्ये विविध पक्ष संघटना तसेच भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होणार आहे.

यापार्श्वभूमीवर सिल्लोड बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, महिनाभरात तीन वेळा बाजारपेठ बंद ठेवावी लागत असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. तरी देखील भाजपकडून सिल्लोडमध्ये मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Soyabean Crop : सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत; पाने खाणारी आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

Sachin Tendulkar Net Worth: लंडनमध्ये घर अन् अलिशान कार; क्रिकेटर सचिन तेंडूलकरची संपत्ती किती?

Diabetes Care : डायबिटीजमध्ये गोड खाणे शक्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

OBC Reservation: मराठा आरक्षणानंतर ओबीसी एकटवले, दोन दिवस मुंबईत बैठक |VIDEO

SCROLL FOR NEXT