Chhatrapati sambhajinagar News  Saam TV
महाराष्ट्र

Chhatrapati sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरातील राड्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; आंबादास दानवेंनी भाजप, एमआयएमला धरले जबाबदार

Chhatrapati sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरातील हिंसाचारानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप; आंबादास दानवेंनी भाजप, एमआयएमला धरले जबाबदार

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Violence in Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरात काल रात्री दोन गटात तुफान राडा. रात्री साडेअकरा ते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत हिंसाचार सुरू होता. यावेळी जमावाले पोलिसांची वाहनं जाळली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार देखील केला. दरम्यान आता शहरातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

परंतु या हिंसाचारानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री झालेल्या राड्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या हिंसाचारासाठी थेट भाजप आणि एमआयएमला जबाबदार धरले आहे.

दानवेंचे थेट भाजप, एमआयएमवर आरोप

आंबादास दानवे म्हणाले, एमआयएम आणि भाजपकडून जाणीवपूर्वक गेल्या काही दिवसांपासून सामाजिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने आंदोलने केली जात आहेत. हा त्याचाच परिपाक आहे. हे आता किती सहन करायचं? असा सवाल करत दानवे यांनी भाजप आणि एमआयएमवर आरोप केले आहेत. तसेच पोलीस आयुक्तांनी आता कडक भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी देखील दानवे यांनी केली आहे. (Sambhajinagar News)

घटनेत कोणाचा सहभाग? तपास सुरू

छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. या घटनेत कोणाचा सहभाग होता हे ट्रेसिंग केले जात आहे. तसेच या प्रकरणात गुन्हे देखील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. (Latest Political News)

रात्री हिंसाचारादरम्यान झालेली दगफडफेक, जाळपोळ आणि त्यानंतर झालेल्या नुकसानीप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या घटनेतील प्रमुख दोषींवर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार ₹३०००; सरकारने उचललं मोठं पाऊल

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Municipal Election : प्रचार संपण्याआधीच भाजपला जोरदार धक्का, बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला ₹३००० मिळणार नाही? कारण आलं समोर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT