Sambhajinagar Kannad Municipal Council office Building Collapsed  Saam Tv News
महाराष्ट्र

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Sambhajinagar Kannad Municipal Council office Building Collapsed : या दुर्घटनेमुळे नगरपरिषद प्रशासन अलर्ट झालं असून पाहणी झाल्यावर नुकसानीबाबत माहिती समोर येणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून इमारतीवर पावसाचे पाणी साचून होते, असं नागरिकांचं म्हणणं आहे.

Prashant Patil

माधव सावरगावे, साम टिव्ही

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड नगरपरिषद कार्यालयाच्या इमारतीच्या भिंतीला मोठा तडा गेला होता. ही भिंत कोसळण्याचा अंदाज नागरिक गेल्या काही दिवसांपासून व्यक्त करत होते. आज दुपारच्या सुमारास अचानक ही दुमजली इमारत कोसळली यामुळे एकच धांदल उडाली. ही इमारत तहसील कार्यालयासमोर वर्दळ असलेल्या मुख्य रोडलगत आहे. इमारत पडण्याचे संकेत मिळताच त्यातील दुकानादारांनी सावध पवित्रा घेऊन सतर्क होऊन दुकानातून बाहेर धाव घेतली. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या दुर्घटनेमुळे नगरपरिषद प्रशासन अलर्ट झालं असून पाहणी झाल्यावर नुकसानीबाबत माहिती समोर येणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून इमारतीवर पावसाचे पाणी साचून होते, असं नागरिकांचं म्हणणं आहे. नगरपालिकेनं बांधलेली इमारत ही जुनी असल्यामुळे जीर्ण झाली होती. त्यामुळे नगरपालिकेने या कॉम्प्लेक्समधील दुकानदारांना नोटीसाही पाठवल्या होत्या. मात्र, दुकानदारांनी आपली दुकानं खाली केलीच नाहीत. आज दुपारच्या वेळेस अचानक ही इमारत कोसळली. त्यामध्ये वरच्या मजल्यावरवरील सहा दुकाने पूर्णता: पडली आहे. त्यात बऱ्याच जणांचं साहित्य अडकलेलं आहे. त्यासोबत खालच्या बाजूलाही काही दुकानांवर मलबा पडल्यामुळे नुकसान झालं आहे. जवळपास ३२ दुकाने या इमारतीमध्ये होते.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओत घटनेचा थरार अतिशय अचूकपणे कैद झाला आहे. सुदैवाने इमारत कोसळली त्या भागाची दुकानं बंद होती. पण त्याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर काही लोकं होते. घटना घडत असताना पहिल्या मजल्यावरच्या काही जणांनी तातडीने जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. त्यामुळे ती बचावली. संबंधित इमारत धोकादायक होती का? आणि असेल तर मग तिथे दुकानं कशी सुरु होती? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये वाघाचा मुक्त संचार, पकडण्यासाठी वनविभागाकडून हालचाली सुरू

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

SCROLL FOR NEXT