Chhatrapati Sambhajinagar Saam Digital
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : भरधाव कारने दुचाकीला उडवलं; पती पत्नीचा जागीच मृत्यू, कारचालक फरार

Chhatrapati Sambhajinagar Accident News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लेंभेवाडी फाट्याजवळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात पती पत्नी जागीच ठार झाले आहेत.

Sandeep Gawade

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लेंभेवाडी फाट्याजवळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार आणि स्कुटीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्कुटीवरील दाम्पत्य जागीच ठार झालं आहे. अपघातानंतर कार चालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला आहे. सतिश शाहू मगरे व तेजल सतिश मगरे अशी मृतांची नावं असून अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील रहिवासी आहेत.

छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे जात असलेल्या भरधाव कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं होतं. याचदरम्यान मगरे दाम्पत्य छत्रपती संभाजीनगरला स्कुटीवरून जातं होतं. भरधाव कार लेंभेवाडी फाट्याजवळ दुभाजकाला धडकली आणि या दाम्पत्याच्या दुचाकीला जाऊन धडकली. कार ओढ्यात जाऊन पडली. त्यासोबत स्कुटीही फरफटत गेली आणि दोघं पती पत्नी कारखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर कारचालकाने तिथून पळ काढला आहे. परिसरातील नागरिकांनी कार बाजूला करून मृतदेह बाहेर काढले. दरम्यान या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आयशरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाक्यावर आज सायंकाळी आयशर ट्रकने धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे, या महिलेचे नाव चंद्राबाई वंडार म्हात्रे असे असून ती खरड गावची रहिवासी आहे. हिललाईन पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, जखमी महिलेचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT