Chhatrapati Sambhajinagar Accident. saam tv
महाराष्ट्र

Accident : खासदाराच्या कार्यालयासमोर भयंकर अपघात! आधी उडवलं, नंतर फरफटत नेलं; अपघाताचा थरारक VIDEO

Accident News : शिंदेसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर भीषण अपघात झाला. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. व्हिडीओमध्ये महिलेला धडक दिल्याचे पाहायला मिळते.

Yash Shirke

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात

  • महिलेला कारने धडक मारत फरफटत नेलं

  • संदिपान भुमरेंच्या कार्यालयासमोर घडली घटना

माधव सावरगावे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात घडला. एका चारचाकी कारने रस्त्यावरुन चालणाऱ्या महिलेला उडवले. काही अंतरापर्यंत कारने महिलेला फरफटत नेले. अपघातामध्ये महिला गंभीररित्या जखमी झाली. हा संपूर्ण प्रकार शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदिपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर घडलेला होता. आता अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये भरधाव वेगाने येणारी कार पाहायला मिळते. कारने एका महिलेला उडवल्याचे व्हिडीओत दिसते. धडक दिल्यानंतर महिलेच्या शरीरावरुन कारचे उजवे चाक गेले. थोड्या अंतरापर्यंत कारने महिलेला फरफटत नेले. त्यानंतर कार थांबून त्यातून दोन तरुण बाहेर आल्याचे सीसीटीव्ही व्हिडीओत दिसते.

मिळालेल्या माहितीनुसार, काल बुधवारी (१३ ऑगस्ट) हा अपघात झाला होता. कारने रस्त्यावर चालणाऱ्या एका महिलेला जोरदार धडक मारली. त्यानंतर तिला फरफटत नेले. कारमधील चालक आणि त्याच्या साथीदाराने जखमी महिलेला रस्त्याच्या बाजूला ठेवले आणि ते दोघे कार घेऊन पसार झाले. या घटनेचे आज (१४ ऑगस्ट) सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघात झाला. अपघातामध्ये एक महिला गंभीररित्या जखमी झाली. धडक मारल्यानंतर कारने महिलेला फरफटत नेले. त्यानंतर महिलेला रस्त्याच्या बाजूला ठेवून कारचालक पळून गेला. महिलेला जमावाने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा संपूर्ण प्रकार खासदार संदिपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर घडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Women Cricket Team : अभिमानास्पद क्षण! विश्वविजेत्या लेकींनी घेतली PM मोदींची भेट, पहिली झलक समोर

मोठी बातमी! निवडणूक प्रचारादरम्यान NDAच्या महिला उमेदवारावर हल्ला,दगडफेकीत आमदाराचं डोकं फुटलं

India A Squad : वनडे संघात रोहित शर्मा, विराट कोहलीला स्थान नाही; इंडिया ए संघाची घोषणा, तिलक वर्मा कॅप्टन

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार

नेल एक्स्टेंशन करताना 'या' गोष्टींची अवश्य काळजी घ्यावी

SCROLL FOR NEXT