Father Son Drowned In River: Saamtv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: देवीचे विसर्जन करायला गेले, बाप- लेक नदीत बुडाले; काळीज पिळवटून टाकणारी घटना

Father Son Drowned In River: देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना पूर्णा नदीत बाप लेक बुडाल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सध्या अग्निशामक दल आणि रेस्क्यु पथक यांच्याकडून दोघांचीही शोध मोहिम सुरू आहे.

Gangappa Pujari

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News: राज्यभरात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. सार्वजनिक मंडळातील देवींचे मोठ्या जल्लोषात विसर्जनही करण्यात आले. अशातच छत्रपती संभाजीनगरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना पूर्णा नदीत बाप लेक बुडाल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सध्या अग्निशामक दल आणि रेस्क्यु पथक यांच्याकडून दोघांचीही शोध मोहिम सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले बाप लेक बुडाण्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडच्या वांजोळा परिसरात घडली. पूर्णा नदीपात्रामध्ये हे दोघं बापलेक देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते त्यावेळी ही भयंकर घटना घटना घडली. सांडू नामदेव सागरे आणि निवृत्ती सांडू सागरे असे या दोघांची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही पथकांनी नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली मात्र अद्यापही या बाप लेकाचे मृतदेह या पथकाच्या हाती लागले नसून शोध मोहीम सुरूच आहे. दसऱ्याच्या दिवशी बाप- लेक नदीत बुडाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, यावेळी त्यांचा १४ वर्षाचा मुलगा नदीकाठी उभा राहिल्याने सुदैवाने तो बचावला. त्याने याबाबतची माहिती दिल्यानंतर गावकरी नदीकडे धावले. त्यानंतर बचाव पथकांना याबाबतची माहिती देण्यात आली. बचाव पथकांनी सायंकाळपर्यंत त्यांचा शोध घेतला, मात्र यश आले नाही. शेवटी अंधार पडल्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आले. रविवारी पुन्हा शोधकार्य सुरु केले जाणार असल्याची माहिती पोेलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT