Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू meta ai
महाराष्ट्र

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Maharashtra News : छत्रपती संभाजीनगरातील ससे कुटुंबावर डेंग्यूच्या आजारामुळे दु:खाचा डोंगर कोसळला असून १२ वर्षीय सोहमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Saam Tv

छत्रपती संभाजीनगरात मन हेलावून टाकणारी घटना घडली. डेंग्यूमुळे हसतं खेळतं ससे कुटुंब उद्ध्वस्त झालं. डेंग्यूची लागण झाल्यामुळे नवरा आणि मुलगी रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना दुसरीकडे साथीच्या आजाराने पोटच्या पोराचा देखील मृत्यू झाला. परिस्थिती इतकी खराब होती की मुलाला अग्निही देता येत नव्हता. महिला पती आणि मुलीचा जीव वाचावा यासाठी धडपडत होती. कुटुंबावर आलेल्या या संकटामुळे संपूर्ण गाव हळहळले आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील एका कुटुंबावर अक्षरक्ष: दु:खाचा डोंगर कोसळला आहे. करंजखेड येथे राहणारे ससे कुटुंबाला डेंग्यूची लागण झाली. सोहम ससे या १२ वर्षाच्या मुलाला २ सप्टेंबर रोजी ताप आला. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मुलावर उपचार सुरू असतानाच मुलगी आणि वडि‍लांना देखील या आजाराची लागण झाली. त्यांनाही उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल करावे लागले. उपचारादरम्यान सोहमचा मृत्यू झाला. एका आईने अवघा १२ वर्षाचा मुलगा गमावला तर दुसरीकडे याच कुटुंबातील कर्ता पुरूष आणि मुलगी देखील मृत्यूशी झुंज देत होते.

मुलगा देवाघरी गेला ही गोष्ट आईला काळजावर दगड ठेवून तब्बल ५ दिवस त्याच्या जन्मदात्या वडिलांपासून आणि बहिणीपासून लपवून ठेवावी लागली. मुलाचे पार्थिव शवगृहात ठेवण्यात आले. दरम्यान, पती आणि मुलगी धोक्याबाहेर आल्यानंतर अखेर सोहमच्या मृत्यूची बातमी कुटुंबियांना देण्यात आली. ज्या बापाने आपल्या लेकाला खांद्यावर खेळवले, त्याच बापाच्या खांद्यावरून १२ वर्षीय सोहमचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणले गेले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आई-वडील आणि बहीण घरी परतत असताना त्यांच्यासोबत सोहमचे पार्थिवही होते.

हा हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग पाहून करंजखेड गावातील ग्रामस्थ आणि उपस्थितांचे डोळे अक्षरशः अश्रूंनी डबडबले होते. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये शोककळा पसरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT