Chhatrapati Sambhajinagar Crime saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांपुढे मैत्री हरली! उधार दिलेले पैसे परत मागितले म्हणून युवकाने केलं भयानक कृत्य

Chhatrapati Sambhajinagar Latest Update: शहरातील कुवारफल्ली येथे हा भयंकर प्रसंग घडला. या घटनेचं अंगावर शहारे आणणारे सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar News: उधार दिलेले पैसे परत मागितले म्हणून युवकाला चाकुने मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. शहरातील कुवारफल्ली येथे हा भयंकर प्रसंग घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन 6 दिवस उलटले तरी आरोपी अद्याप मोकाट आहे. या घटनेचे अंगावर शहारे आणणारे सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आले आहे.

उधार दिलेले पैसे परत मागितले म्हणून झालेल्या वादात तरुणाने थेट चाकू आणि लोखंडी रॉडने युवकास गंभीर जखमी केल्याच्या घटनेने संभाजीनगर शहर हादरलं आहे. शहरातील कुवारफल्ली भागात ही घटना घडली. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होऊन 6 दिवस उलटले तरी आरोपी अद्याप मोकाट आहेत.

जुना बायजीपुरा भागात राहणारे नीलेश लुटे यांनी त्यांच्या ओळखीच्या रोहित कावेटी याला 50 हजार रूपये उधार दिले होते. काही दिवसांनी नीलेश यांनी पैसे परत मागितले, तेव्हा रोहितने ते पैसे परत देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. (Crime News)

यानंतर संतापलेल्या रोहितने त्याचा मित्र गौरव जटावाले याला बोलावून घेतलं आणि कुवारफल्ली भागात नीलेशवर चाकुने हल्ला केला. रोहितने नीलेशला लोखंडी रॉडनेही मारहाण केली. या घटनेत नीलेश गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT