Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: १० रुपयांचा वाद... पाणीपुरीवाल्याकडून दारुड्या तरुणाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

Crime News Update: विशेष म्हणजे हत्येनंतर आरोपी रोहित चौधरी स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला.

Gangappa Pujari

नवनीत तापडिया, प्रतिनिधी...

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील पुंडलिक नगर भागात एका पाणीपुरी वाल्याने दारुड्या तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या खूनाच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरात पाणीपुरीवाल्याने एका दारुड्या तरुणाची डोके ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. रोहीत चौधरी असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

शहरातील पुंडलिक नगर (Pundliknagar Area) भागात एका बार समोर या दोन तरुणांमध्ये अचानक वाद सुरू झाला. दहा रुपयांमध्ये दारू मिळते का? यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले. हा वाद इतका वाढत गेला की या भांडणाचे रूपांतर हारामारी झाले. (Crime News)

स्वतः हून पोलिस ठाण्यात हजर

या भांडणात आरोपी रोहितने जवळील गट्टू उचलून समोरील तरुणांच्या डोक्यात घाव घातले, ज्यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे हत्येनंतर आरोपी रोहित चौधरी स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT