Raigad News: महाडच्या कसबे शिवथर गावात जमिनीतून मोठा आवाज; नागरिक भयभीत

Raigad Mahad Latest News: रायगडमधून एक मोठी बातमी समोर येतेय. रायगडच्या महाड तालुक्यातील कसबे शिवथर गावच्या परिसरात मागील काही दिवसांपासून भूगर्भातून मोठमोठे आवाज येत आहेत.
raigad News loud noise from the ground at kasbeshivathar village in mahad taluka
raigad News loud noise from the ground at kasbeshivathar village in mahad talukaSaam TV
Published On

सचिन कदम, साम टिव्ही

Raigad Mahad Latest News: रायगडमधून एक मोठी बातमी समोर येतेय. रायगडच्या महाड तालुक्यातील कसबे शिवथर गावच्या परिसरात मागील काही दिवसांपासून भूगर्भातून मोठमोठे आवाज येत आहेत. त्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. शनिवारी (दि.५) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास देखील जमिनीमध्ये मोठा हादरा झाल्याचा आवाज झाला.

raigad News loud noise from the ground at kasbeshivathar village in mahad taluka
Mumbai Megablock: मुंबईकरांनो, विकेंडला घराबाहेर पडताय? आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

यानंतर घाबरलेल्या नागरिकांनी या घटनेची माहिती तातडीने प्रशासनाला दिली. ही घटना कळताच महाड पोलीस अपत्ती विभाग घटनास्थळी रात्री पोहचले आणि घटनेचा आढावा घेतला. दरम्यान, आज (दि.६) सकाळी या घटनेची दखल घेत महाडचे प्रांताधिकारी, तहसीलदार, एनडीआरफ टीम घटनास्थळी पोहचली आहे.

यावेळी नागरिकांनी प्रशासनाकडे हा नेमका काय प्रकार आहे, याची विचारणा करून शोध घेण्याची मागणी केली. महाड तालुक्यात गेल्या दीड महिन्यात तुफानी पाऊस झाला आहे. काही दिवसापूर्वी पारमाची गावातील घरांना तडे गेल्याचे व जमिनीत उंचवटे निर्माण झाल्याचे प्रकार समोर आल्यानंतर येथील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याचे आवाहन केले होते.

raigad News loud noise from the ground at kasbeshivathar village in mahad taluka
Bacchu Kadu on Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार नकोच, आहे तसंच राहू द्या; आमदार बच्चू कडूंचं विधान

या दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून कुंभे शिवथर, कसबे शिवथर आणि चेराववाडी परिसरात जमिनीतून स्फोटासारखे आवाज येत असल्याने जनतेत घबराट निर्माण झाली आहे. दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या कसबे शिवथर गावात ७० ते ८० घरं आहेत.

दरम्यान, महाडचे प्रांताधिकारी ज्ञानेश्वर बाणापुरे यांनी महसूल कर्मचारी, पोलीस यंत्रणा तसेच एनडीआरएफच्या टीमसह गावाला भेट दिली आणि दिवसभर पाहणी केली. मात्र, त्यांना काही यामागची कारणे समजू शकली नाहीत. या टीम ने ग्रामस्थांना धीर देत सतर्क राहण्यास सांगितले आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com