Yogiraj Gangagiri Maharaj Saamtv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: तब्बल १७६ वर्षाची ऐतिहासिक परंपरा! गंगागिरी महाराजांच्या हरिनाम सप्ताहाची गिनीज बुकात नोंद

Yogiraj Gangagiri Maharaj: वैजापूरमध्ये सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या 176 व्या अखंड हरिनाम सप्ताहास लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावात सुरुवात झाली.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या 176 व्या अखंड हरिनाम सप्ताहास लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावात सुरुवात झाली. विशेष म्हणजे शतकीय वर्षे परंपरा असलेला गंगागिरी महाराज यांचा अखंडपणे सुरू असलेला हा सप्ताह जगातील आणखी एक आश्चर्यच आहे. त्यामुळेच या सप्ताहाची थेट गिनीज बुकात नोंद करण्यात आली आहे..

याबाबत अधिक माहिती अशी की, सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या 176 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरवात झाली आहे. या सप्ताहाची परंपरा मोठी आहे. एकूण 200 एकरमध्ये होणाऱ्या या सप्ताहात तब्बल 168 तास अखंडपणे हरिनाम जप आणि भजन सुरू आहे. यासाठी संभाजीनगर, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो भाविक येथे दाखल झाले आहेत.

सप्ताहासाठी एकूण 200 एकर जागेत 200 बाय 300 चौमीचा भव्य हरिनाम जप प्रहर मंडप उभारला आहे. या ठिकाणी 10 ते 12 हजार प्रहरी आठ-आठ तासाच्या तीन प्रहरात 168 तास अखंड हरिनाम जप आणि भजन सुरू आहे. हा ऐतिहासिक सोहळा अनुभवायला लाखो भाविक दाखल झाले आहेत. भाविकांसाठी 300 चौरस मीटर जागेवर दररोजच्या महाप्रसादासाठी भव्य प्रसादालय उभारण्यात आले आहे.

उपस्थित भाविकांना पूरणपोळ्या आणि मांडेचा प्रसाद देण्यात येतो. तर एकादशीच्या दिवशी 250 ते 300 क्विंटल साबुदाना, 50 क्विंटल भगर असे फराळ भाविकांना वाटण्यात येणार आहे. इतक्या लोकांच्या प्रसादासाठीची तयारीही तितकीच मोठी आहे.

सकाळी सात वाजता या स्वयपाकांला सुरूवात होते. प्रसादासाठी दररोज शंभर गावे आपली ट्रॅक्टर घेऊन गावातून वाजत गाजत मिरवणूक काढत सप्ताहाच्या ठिकाणी भाकरी आणतात. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha/OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या जीआरवर भुजबळांची अॅक्शन, थेट फडणवीस सरकारवरच गंभीर आरोप, वाचा सविस्तर

Weight Loss Tips : हे कडधान्य रोज रात्री भिजवून खा अन् वजन कमी करा

Nepal Protest : नेपाळमध्ये अराजक स्थिती, भारतीयांसाठी मोदी सरकारकडून एडवायजरी, वाचा नेमकं काय सांगितलं

Akshay Kumar Birthday: '१५० हून अधिक चित्रपट आणि...', वाढदिवसानिमित्त खिलाडी कुमारची खास पोस्ट, मानले प्रेक्षकांचे आभार

Vice Presidential Election: आगे आगे देखो होता है क्या; देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान|VIDEO

SCROLL FOR NEXT