Chhatrapati Sambhajinagar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये रक्तरंजित थरार, २२ सेकंदात मजुरावर २२ वेळा चाकूने वार; माथेफिरूचं भयानक कृत्य

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरात एका माथेफिरू तरुणाने २२ सेकंदात तब्बल २२ वेळा मजुरावर चाकूने सपासप वार केले.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका माथेफिरू तरुणाने मजुराला भररस्त्यात अडवलं. त्यानंतर २२ सेकंदात तब्बल २२ जीवघेणे वार करत त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. थरकाप उडवणारी ही घटना शहरातील उस्मानपुरा भागात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी आरोपीला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेनं शहरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशोक दादाराव शिनगारे, असं मृत मजुराचे नाव असून निखिल शिंगाडे असे माथेफिरू तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आणि आरोपी हे एकाच परिसरात राहतात. आरोपी निखिल शिंगाडे हा गेल्या ६ महिन्यांपासून कोमात होता.

डॉक्टरांच्या उपचारानंतर नुकताच तो कोमातून बाहेर आला होता. मंगळवारी मृत अशोक शिनगारे हे पहाटे ५ वाजता फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. मॉर्निंग वॉक करीत असताना त्यांच्या ओळखीचा निखिल शिंगाडे, प्रज्योत शिंगाडे आणि अक्षय गायकवाड हे बोलत थांबले असताना अचानक निखिलने चाकूने यांच्यावर हल्ला केला.

आरोपीने शिनगारे यांच्या पाठीवर, मानेवर, तोंडावर धारदार शस्त्राने २२ सेकंदात तब्बल २२ वेळा सपासप वार केले. धक्कादायक बाब म्हणजे, शिनगारे खाली कोसळल्यानंतर देखील आरोपी वार करीत होता. चाकूने हल्ला केल्यानंतर तेथे उभे असलेले प्रज्योत आणि अक्षयने घाबरून पळ काढला.

हल्ला केल्यानंतर संशयित आरोपी निखिल शांततेत तेथून निघून गेला. मोठा रक्तस्त्राव झाल्याने शिनगारे यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येचा हा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हल्ल्यामागचं कारण मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला तातडीने अटक केली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT