Chhatrapati Sambhajinagar Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन शासकीय रुग्णालयात मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • बिडकीन रुग्णालयात लाचखोरीचा प्रकार उघड

  • ACB चा सापळा; दोघांना रंगेहाथ अटक

  • ६ हजारांची मागणी, १२०० रुपयांवर सौदा

  • सरकारी योजनेतही भ्रष्टाचार उघड

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या बिडकीन शासकीय रुग्णालयात मोफत होणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय बजरंग दळवी (वय ५८) व सफाई कर्मचारी नारायण हरिश्चंद्र ब्राह्मणे (वय ३७) यांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रादाराच्या बहिणीच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी ५ एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे संपर्क साधण्यात आला होता. यावेळी संबंधित शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून मोफत असतानाही डॉ. दळवी यांनी सुरुवातीला तब्बल ६ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने ६ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष करण्यात आली असता, डॉ. दळवी यांनी १२०० रुपयांवर ‘तडजोड’ करत ही रक्कम त्यांच्या वतीने सफाई कर्मचारी नारायण ब्राह्मणे याच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला.

तक्रारदाराकडून देण्यात आलेली १२०० रुपयांची लाच स्वीकारताना नारायण ब्राह्मणे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर मुख्य आरोपी डॉ. दळवी यांनाही शोधून ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय दळवी यांना निवृत्ती करिता फक्त ०३ महिने कालावधी राहिला होता. या घटनेने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पानसरेंच्या पुस्तकावरून वाद, कार्यकर्त्यांची धरपकड; संजय गायकवाडांची मुजोरी कायम

मराठी सक्तीवरून सरनाईकांचं नवं कोडं; १ मेपासून मराठी सक्ती, मात्र कारवाई नाही

Maharashtra News Live Update: दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी काढण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा जलयात्रेचे धुळ्यात जल्लोषात स्वागत

Pune Crime: भररस्त्यात भाजप कार्यकर्त्याची हत्या, ९ गोळ्या झाडत जागीच संपवलं; पुणे हादरले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे ₹१५०० बंद होणार, ई-केवायसीबाबत सरकारने दिली महत्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT