Sambhajinagar Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident: घरी पोहचण्यापूर्वी काळाचा घाला, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली; तिघांचा जागीच मृत्यू

Sambhajinagar Accident: संभाजीनगरमध्ये कारला भीषण अपघात झाला. भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभी जखमी झाले आहेत.

Priya More

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये कारला झालेल्या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. कार पुलावरील दुभाजकाला धडकली. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा तपास संभाजीनगर पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील बिल्डा फाट्याजवळ कारला भीषण अपघात झाला. रात्री ११ वाजताच्या सुमारास भरधाव कार पुलावरील दुभाजकाला जोरदार धडक दिली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दुभाजकावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

सय्यद मारुफ सय्यद माजेद, अरफात बागवान, रेहान सय्यद अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील राहणारे ५ जण कारने फुलंब्रीहून छत्रपती संभाजीनगरकडे येत होते. मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांची भरधाव कार बिल्डा गावानजीक असलेल्या पुलावरील दुभाजकाला जोराची धडकली. त्यानंतर ही कार उलटली. अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला.

अपघातामध्ये कारमधील सय्यद मारुफ सय्यद माजेद, अरफात बागवान आणि रेहान सय्यद यांचा जागीच मृत्यू झाला. तर सय्यद उजेफ आणि शेख शारीक हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच फुलंब्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सहाणे हे कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update : सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी प्रेत ठेवले थेट ग्रामपंचायतमध्ये

SCROLL FOR NEXT