Accident News
Accident NewsSaam tv

Accident News : भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत रिक्षा उडाली; दोघांचा मृत्यू, चार प्रवासी गंभीर

Akola News : पातुर- बाळापूर रस्त्यावरील बाबूळगाव जवळ हा भीषण अपघात झाला आहे. यात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने या अपघातात ऑटो रिक्षा मधील काही प्रवासी गंभीर जखमी
Published on

अक्षय गवळी 
अकोला
: प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रकच्या धडकेत रिक्षातील सर्व प्रवासी रस्त्यावर फेकले गेले असून यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षातील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर वाहतूक काही काळ खोळंबली होती. 

अकोल्याच्या पातूर जवळ प्रवासी रिक्षा आणि ट्रकमध्ये धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. पातुर- बाळापूर रस्त्यावरील बाबूळगाव जवळ हा भीषण अपघात झाला आहे. यात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने या अपघातात ऑटो रिक्षा मधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान यात रिक्षातील दोन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

Accident News
Nandurbar Crime : विरोधात जबाब दिल्याने जमावाचे भयानक कृत्य; साक्षीदार पती- पत्नीला मारहाण करत घर जाळले

दहा फूट उडाली रिक्षा 

ट्रकची धडक इतकी भीषण होती की रिक्षा दूरवर जाऊन पलटी झाली. यात रिक्षातील सर्व प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. यात रिक्षातील प्रवासी पियुष रविंद्र चतरकर (वय १३, रा.सिंधी कॅम्प, अकोला) आणि लिलाबाई ढोरे (वय ५०, रा.लाखनवाडा) या दोघांचा मृत्यू झाला. तर सुरेंद्र चतरकर (वय ४५), रविंद्र चतरकर (वय ५२), रूपंचंद वाकोडे (वय ५०), प्रमिलाबाई वाकोडे (वय ६५) हे गंभीर जखमी झाले आहेत.

Accident News
Pandharpur : पंढरपुरात विठ्ठल टोकन दर्शनाचा काळा बाजार; बोगस टोकन घेऊन येणाऱ्या सात भाविकांना पकडले

ट्रक चालक फरार 

अपघात घडताच रस्त्यावरून जाणाऱ्यांनी वाहने थांबवत मदतीचा हात दिला. यानंतर अपघातातील गंभीर जखमी झालेल्या चौघांना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून बाळापूर पोलीस अधिक तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com