पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी नव्याने टोकन दर्शन सुविधा सुरु करण्यात आली आहे. मात्र नव्याने सुरू करण्यात आलेल्या टोकन दर्शनाचा काळाबाजार काही दिवसातच समोर आला आहे. यामध्ये बोगस टोकन दर्शनाची पास घेऊन येणारे सात भाविकांना पकडण्यात आले आहे. तर टोकन दर्शन पासमध्ये हेराफेरी झाल्याने टोकन प्रणाली विषयी साशंकता निर्माण झाली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्यासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, बेंगलोर यांच्याकडून सेवाभावी तत्वावर टोकन दर्शन प्रणाली विकसित करून घेतली आहे. या प्रणालीद्वारे भाविकांना आधीच दर्शनाची वेळ निश्चित करून दर्शनासाठी रांगेत न थांबता ठराविक वेळेत दर्शन हॉलमध्ये प्रवेश घेता येणार आहे. ही प्रणाली विशेषत: गर्दीच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांचा वेळ व श्रम वाचण्यास मदत होण्यास प्रभावी ठरेल या अनुषंगाने टोकण दर्शन पद्धत सुरू करण्यात आली आहे.
सात भाविकांकडे बनावट टोकन दर्शन पास
तिरूपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. दिवसभरात जवळपास १८०० भाविकांना टोकन दर्शन दिले जात आहे. विठ्ठल मंदिर समितीकडून टोकन दर्शनपास बुकिंग सुरू करण्यात आली आहे. मात्र अवघ्या दहा दिवसातच ही प्रणाली कुचकामी ठरली आहे. आज सात भाविकांनी बनावट टोकन दर्शन पास दाखवून दर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यांचा हा प्रयत्न मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या सावधगिरीमुळे फसला आहे.
एका पासच्या केल्या सात पास
टोकन दर्शन पासमध्ये हेराफेरी करून झटपट दर्शन मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे आता उघड झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातून काही भाविक आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी एका टोकन दर्शन पासचे सात दर्शन पास तयार करून दर्शन घेण्याचा प्रयत्न केला असता तो प्रयत्न अखेर फसला. संबंधित लोकांना मंदिर समितीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असून त्यांची चौकशी झाल्यानंतर कारवाई केली जाईल असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.