Chhatrapati Sambhajinagar Accident Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Accident: पैठण रोडवरील कांचनवाडीत मोठा अपघात! ट्रकची दुचाकी आणि गाड्यांना जबर धडक, महिला जागीच ठार

Chhatrapati Sambhajinagar Accident: छत्रपती संभाजीनगरमधील पैठण रोडवरील कांचनवाडी येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar Accident:

छत्रपती संभाजीनगरमधील पैठण रोडवरील कांचनवाडी येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्रकने चार ते पाच मोटार सायकल स्वारासह चार चाकी वाहनांना उडवल्याने मोठा अपघात झाला आहे. यामध्ये एक महिला जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. अपघानंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, धुळे सोलापूर हायवे वरून पैठण रोडवर ट्रक उतरत होता. त्यावेळी उतारावरून ट्रक खाली येत असताना ट्रकने 3 कार, 7 दुचाकी आणि 1 रिक्षाला जोडरदार धडक दिली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या विचित्र अपघातात 1 महिला जागीच ठार झाली असून 6 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अरुंद रस्ता आणि त्यात काम चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीत झालेली होती. त्याचवेळेस हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)

नाशिकमध्ये बस- ट्रॅक्टरचा अपघात

दरम्यान, नाशिकमध्येही भीषण अपघाताची घटना घडली आहे. मनमाड- मालेगाव महामार्गावर मनमाडहून नंदूरबारकडे जात एसटी बस व कांद्याने भरलेल्या ट्रॅकरचा अपघात झाला. यामध्ये ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. यात बस प्रवासीही जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बस व ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघात अपघातात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने रस्त्यावर सर्वत्र कांदा फेकला गेला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचत त्यांनी अधिक तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT