Mamata Banerjee: ममता बॅनर्जी यांच्यामुळे वाढणार इंडिया आघाडीचं टेन्शन? TMC सर्व 42 जागांवर लढवणार निवडणूक?

India Alliance News: पश्चिम बंगालमधील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीमधील जागावाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
Mamata Banerjee news
Mamata Banerjee news saam tv
Published On

India Alliance News:

पश्चिम बंगालमधील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीमधील जागावाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. यापूर्वी टीएमसीने पश्चिम बंगालमधील विद्यमान दोन काँग्रेस जागांवर आपले उमेदवार उभे करणार नसल्याचे सांगितले होते.

यातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना एका अंतर्गत बैठकीत सांगितले की, टीएमसी राज्यातील सर्व 42 जागा लढवू शकते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mamata Banerjee news
Prakash Ambedkar: जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांनी दिला सल्ला

सूत्रांनी असं ही म्हटलं आहे की, टीएमसीच्या एका बड्या नेत्याने सांगितले की, बॅनर्जी यांनी त्यांच्या दक्षिण कोलकाता निवासस्थानी झालेल्या बैठकीत हे वक्तव्य केलं आहे.  (Latest Marathi News)

यातच बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी 1999 पासून मुर्शिदाबादच्या बेरहामपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी मिळवत आले आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार, जिल्ह्यामध्ये बंगालमधील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या 66.28 टक्के आहे. सीपीएम (M) प्रमाणे काँग्रेसला 2021 मध्ये बंगालमध्ये विधानसभेची एकही जागा जिंकता आली नाही.

Mamata Banerjee news
Katraj- Kondhwa Road: पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी 200 कोटींचा निधी उपलब्ध होणार? अजित पवार म्हणाले...

नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना टीएमसीच्या एका वरिष्ठ नेत्याने सूत्रांना सांगितले की, “बैठकीत जेव्हा भरतपूरचे आमदार हुमायून कबीर म्हणाले की, ''मुर्शिदाबादमध्ये अधीर रंजन चौधरी यांची उपस्थिती मोठी आहे. तेव्हा बॅनर्जी संतापल्या. त्या संतप्त स्वरात म्हणाल्या की, चौधरी हे अजिबात अडचण ठरू शकता नाही. कारण 2021 मध्ये टीएमसीने त्यांच्या मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघ जिकल्या होत्या. तसेच 2019 मध्ये मुर्शिदाबाद आणि जंगीपूर या जिल्ह्यातील इतर दोन लोकसभा जागाही जिंकल्या.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com