Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News: छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कार गोल गोल गरागरा फिरली अन् ४ वाहनांना धडकली, भयंकर अपघाताचा VIDEO

Chhatrapati Sambhajinagar Car Accident At Kale Petrol Pump: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कारने तीन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिलीय. या घटनेत चारजण जखमी झाले आहेत.

Rohini Gudaghe

माधव सावरगावे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक विचीत्र अपघाताची घटना समोर आली आहे. ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यामुळे एका कार मुख्य रस्त्यावरील वाहनांना उडवत पेट्रोल पंपावर धडकली. यामध्ये तीन चारचाकी आणि एका दुचाकीस्वाराला कारने उडवल्याचं समोर आलं आहे. या विचित्र अपघातामध्ये चारजण गंभीर जखमी झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातात ९ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. मारिया सईद शेख जानोद्दीन असं मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. चालक अविनाश मोरे या आरोपीला सिल्लोड पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. आरोपीवर कलम ३०४ प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा थरारक अपघात छत्रपती संभाजीनगर-जळगाव रोडवरील माणिकनगर येथील काळे पेट्रोल पंपासमोर घडला (Chhatrapati Sambhajinagar Car Accident) आहे. कारची धडक इतकी जोरदार होती की, या कारच्या एअर बॅग्ज उघडल्या ही होत्या. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या कारने सिल्लोडकडून येणाऱ्या चारचाकीला धडकली, पुन्ही वळण घेऊन या कारने छत्रपती संभाजीनगरहून येणाऱ्या मोटारसायकललाजोराची धडक (Accident News) दिली. त्यानंतर ही कार काळे पेट्रोल पंपात घुसली.

त्यानंतर ही कार पेट्रोल पंपाजवळील खांबाच्या भिंतीला लागून असलेले लोखंडी साइड गार्ड तोडून पेट्रोल टँकला लागून असलेल्या लोखंडी जाळीच्या गार्डमध्ये (Chhatrapati Sambhajinagar News) अडकली. त्यामुळे दुर्घटनाग्रस्त कार जागेवरच थांबली. कार थांबल्यामुळे पंपासमोर असलेले जवळपास तीस जण बचावले आहेत. या घटनेनंतर कारचालक पळून गेल्याचं समोर आलं आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक भरधाव कार पेट्रोल पंपाला धडकल्याचं समोर आलं आहे. या अपघातामध्ये एकूण चारजण जखमी झाले आहेत. ही कार घटनास्थळी नुसती गोल गोल फिरत (Road Accident) होती. या कारने तीन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली आहे. छत्रपती संभाजीनगर-जळगाव रोडवरील माणिकनगर येथे हा अपघात झाला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचं समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT