Tragic Death of Young Woman Saam
महाराष्ट्र

वडिलांना चहा दिला, जिममध्ये गेली, क्षणात खाली कोसळली; २० वर्षीय तरूणीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

Tragic Death of Young Woman: बीड बायपास परिसरात राहणारी आणि बीफार्मसी शिक्षण पूर्ण केलेली 20 वर्षीय तरुणीचे ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू.

Bhagyashree Kamble

  • बीड बायपास परिसरात 20 वर्षीय प्रियांका खरातचा जीममध्ये मृत्यू

  • व्यायाम करताना अचानक कोसळल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला

  • पोलीस हवालदार अनिल खरात यांची एकुलती एक मुलगी होती

  • घटनेनंतर परिसरात आणि कुटुंबात शोककळा पसरली

जीममध्ये एका तरूणीचा हार्टअॅटॅकनं मृत्यू झाला आहे. सुरूवातील तरूणी अचानक चक्कर येऊन खाली कोसळली. तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र,उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बीड बायपास परिसरात घडली आहे. एकुलती एक मुलगी गमावल्याने कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

प्रियांका अनिल खरात (वय वर्ष २०) असं तरूणीचे नाव आहे. तिने बीफार्मसीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. पुढील शिक्षणाची ती तयारी करीत होती. तर, तिचे वडील अनिल खरात पोलीस हवालदार म्हणून कार्यरतआहे. खरात कुटुंब बीड बायपास परिसरातील मस्के पेट्रोल पंपाजवळील अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहे.

गुरूवारी सायंकाळी प्रियांकाची आई घराबाहेर गेली होती. त्यामुळे प्रियांकाने वडिलांना चहा करून दिला. त्यानंतर भाऊ आणि मैत्रिणीसह ती जिमसाठी निघाली. काही वेळ जिममध्ये व्यायाम केल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागलं. ती क्षणात खाली कोसळली. प्रियांकाला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचार सुरू असतानाच तिला ह्रदयविकाराचा झटका आला. ह्रदयविकाराच्या झटक्यानं तिचा दुर्देवी मृत्यू झाला. सायंकाळी गादिया विहार स्मशानभूमीत तिचे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रियांकाच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरली असून, खरात कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Tourism : जोडीदारासाठी रोमँटिक टूर प्लान करताय? महाराष्ट्रातच आहे कमाल डेस्टिनेशन

Beed News : बीडमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश, काय असतील निर्बंध?

TET 2025 परीक्षेबाबत सर्वात मोठी अपडेट; अर्ज, परीक्षा शुल्क अन् वेळापत्रकाची माहिती एका क्लिकवर

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये एका दिवशी भटक्या कुत्र्यांनी घेतला 35 जणांचा चावा

आदित्य ठाकरे उद्या बुरख्यात लपून भारत पाकिस्तान मॅच बघतील; भाजप मंत्र्यांची बोचरी टीका|VIDEO

SCROLL FOR NEXT