Chhatrapati sambhaji nagar Crime Saam TV News
महाराष्ट्र

आधी गळफास, नंतर गॅस लीक करून स्फोट; CA विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

Chhatrapati sambhaji nagar Crime: छत्रपती संभाजीनगरात २० वर्षीय तरुणाने गॅस सिलेंडरचा स्फोट घडवून आत्महत्या केली. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

  • छत्रपती संभाजीनगरात २० वर्षीय तरुणाने गॅस सिलेंडरचा स्फोट घडवून आत्महत्या केली.

  • आधी गळफास घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने तरुणाने दुसरा मार्ग निवडला.

  • परिसरात स्फोटाचा आवाज होताच नागरिकांनी घरात धाव घेतली.

  • पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका २० वर्षी तरूणानं गॅस सिलेंडरचा स्फोट घडवून आणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आधी त्यानं काकाच्या घरात गळफास घेत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न फसला. नंतर त्यानं गॅस सिलेंडरमध्ये कात्री खुपसून गॅस लीक केला. नंतर स्फोट घडवून आणला. यात तरूणाचा मृत्यू झाला. त्यानं आत्महत्या का केली? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ओम संजय राठोड (वय वर्ष २०) असे तरूणाचे नाव आहे. तरूण छत्रपती संभाजीनगरमधील बंबाट नगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी जवाहर नगर परिसरातील न्यू शांतीनिकेतन कॉलनीमध्ये घडली. ओम हा कुटुंबासह बंबट नगर भागामध्ये राहतो.

ओमची आई आणि बहीण काही दिवसांपूर्वी मामासोबत त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी गेली होती. यामुळे वडील आणि तो दोघेच घरी होते. ओमला महाविद्यालय लांब पडत असल्याकारणाने तो काकांकडे जवाहर नगर भागात राहत होता. बुधवारी दुपारच्या सुमारास वडिलांसोबत घरातून तो बाहेर पडला. महाविद्यालयात चार्जर विसरून आल्यानं तो महाविद्यालयातून काकाच्या घरी गेला.

घटनेच्या दिवशी त्यानं काकाच्या घरी काकूसोबच गप्पा मारल्या.यावेळी तो तणावात आहे किंवा त्याला काही अडचण आहे असं काहीच जाणवलं नाही. काही वेळानंतर ओमची काकी मुलांना शाळेतून आणण्यासाठी घरातून पडल्या. मुलाला घेऊन माघारी परतलेल्या काकूंनी ओमला आवाज दिला. मात्र घरातून प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळाने काकूंनी शेजारच्यांना ही माहिती दिली.

मात्र, तेवढ्यात घरातून स्फोटचा आवाज आला. यामुळे घराजवळ नागरिकांनी गर्दी केली. दरवाजा तोडून घरात शिरल्यानंतर ओम आगीच्या विळख्यात दिसला. स्थानिकांनी त्याच्या अंगावर बेडशीट टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला तातडीने जवळच्या रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाचे विजय राठोड यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मुंबई High Court बॉम्बने उडवण्याची धमकी, परिसरात एकच खळबळ

Banjara Samaj : जालन्यात आदिवासी समाजाचा मोर्चा; बंजारा समाजाला आरक्षण नाकारण्याची मागणी | VIDEO

Sarvapitri Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला करा 'ही' खास कामे, घरच्या संपत्तीत होईल वाढ

Astro Tips: महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करा हे सोपे ५ उपाय

Maharashtra Politics: खानदेशात शरद पवारांना मोठा धक्का, जवळची व्यक्ती सोडणार साथ

SCROLL FOR NEXT