Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला एका सरपंचाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संभाजीनगरच्या गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी अनोखे आंदोलन केले आहे. त्यांनी निषेध नोंदवण्याचा साडी नेसून डोक्यावर कळशी घेत आंदोलन केले आहे. त्यांनी महिलेची वेशभूषेत केलेल्या आंदोलनाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
आज (१ फेब्रुवारी) सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या दालनासमोर महिलेच्या वेषात आंदोलन करायला सुरुवात केली. त्यांनी डोक्यावर कळशी देखील घेतली होती. आंदोलन करताना त्यांनी गावातील महिलांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. प्रतिकात्मक आंदोलन केल्याने ते जिल्ह्यात चर्चेत आहेत.
जलजीवन मिशन मागील चार वर्षांपासून पूर्ण न झाल्याची तक्रार मंगेश साबळे यांनी केली. काम पूर्ण न झाल्याने गावातील महिलांना पाणी भरवण्यासाठी वणवण करावी लागते. पिण्याच्या पाण्यासाठी गावकरी पायपीट करत आहेत. महिलांना होणारा त्रास वरिष्ठांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने साडी नेसून आंदोलन केल्याची मागणी साबळे यांनी केली.
आंदोलनादरम्यान ते म्हणाले, "नमस्कार. मित्र हो मी सरपंच साबळे बोलतोय. पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालयात मी सरपंच म्हणून आलो नाहीये. तर या ठिकाणी मी माझ्या गावातील महिलांचा आवाज म्हणून आलोय. माझ्या गावातील महिलांना दोन-दोन किलोमीटर चालत जावून पाणी आणावं लागतं. सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आंदोलन केलं. आज दोन वर्ष जवळपास झाली आहे. २०२० मध्ये जलजीवन मिशनचं काम सुरु झालंय. चार वर्ष झालं हे काम पूर्ण झाल नाहीये. उद्घाटन झालं. १ कोटी ८० लाखांचं बजेट लागलं पण अजूनही काम पूर्ण झालं नाहीये. पूर्ण जिल्ह्यात ही अवस्था आहे. माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी महिलांची अवस्था पोहोचावी म्हणून आज मी असा आलो आहे."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.