Chhatrapati sambhaji nagar News : छत्रपती संभाजीनगर नामांतरावरचे सगळे अडथळे आता दूर होतील आणि छत्रपती संभाजीनगर हेच नाव कायम राहणार, यावर आता शिक्कामोर्तब होणार असं दिसतंय. कारण केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयानंतर नागरिकांनीही समर्थनांचे पत्र विरोधापेक्षा जास्त दिलेत. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून सुरू असलेल्या नामांतराच्या राजकारणाचा धुरळा शांत होईल, अशी चिन्हे आहेत. (Latest Marathi News)
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं ही 35 वर्षांपासून मागणी होती. आणि ती मागणी रोजी पूर्ण झाली. मात्र, काही खासदार इम्तियाज जलील, एमआयएम पक्ष आणि मुस्लिम संघटनांनी विरोध करीत आंदोलन सुरू केले. शिवाय कोर्टाचीही पायरी चढली. पण आता ते टिकणार नाही आणि छत्रपती संभाजीनगरच हे नाव कायम राहील असे स्पष्ट दिसतेय.
कारण केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारने ज्या आक्षेप, हरकती आणि सूचना मागवल्या होत्या, त्यात सर्वात जास्त या समर्थनाच्या सूचना आहेत.
शिंदे - फडणवीस सरकारने औरंगाबादचे (Aurangabad) नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यास मान्यता दिली. १६ जुलै २०२२ रोजी निर्णय घेऊन मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. केंद्र सरकारनेही २४ फेब्रुवारी २०२३ रोजी अधिसूचना काढली.
या निर्णयानंतर जल्लोष करण्यात आला. पण खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलन सुरू केले. त्याशिवाय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आणि केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या.
35 वर्षांपासून सुरू असली मागणी पूर्ण झाल्यानंतर हा विषय इथे संपेल असं बोललं जात असताना पुन्हा या विषयाला वेगळं मिळालं. पण आता विरोध करणाऱ्या पेक्षा समर्थनांची संख्या जास्त असल्यामुळे ते पत्र न्यायालयातही ग्राह्य धरले जाणार आणि अडथळे दूर होणार असे सांगितले जातंय.
आता छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ एकूण अर्जांची संख्या ४ लाख ३ हजार १५ तर विरोधात २ लाख ७३ हजार २१० हरकती आल्या आहेत. त्यामुळे आता अडथळे दूर होऊन छत्रपती संभाजीनगर नामांतरावरून सुरू असलेल्या राजकारणाचा धुरळा अखेर शांत बसेल असे दिसतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.