Crime News Saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरामध्ये नशेचा बाजार; कॉलेज तरुण व्यसनाच्या आहारी

डॉ. माधव सावरगावे

chhatrapati sambhaji nagar: छत्रपती संभाजीनगरामध्ये सध्या नशेचा बाजार सुरू असल्याचे समोर आलं आहे. पोलीस आयुक्त आणि पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत एकाच वेळी चार ठिकाणी छापे टाकत अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहे. कॉलेज तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याचे काही व्हिडिओ पोलीस आयुक्तांकडे आले होते. त्यावरून कारवाई करण्यात आली आहे. त्यात एकाला अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

नशेत झिंगणारी असलेले तरुण आणि त्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर महाराष्ट्र हादरून गेला आहे. हा व्हिडीओ पुणे जिल्ह्यात झालेल्या एका पार्टीतला आहे. त्यात नशा करणारे तरुण-तरुणी हे काही तरुण छत्रपती संभाजीनगरचे आहेत.

तरुणांनी नशा करतानाचे व्हिडिओ शूट केले आहेत. काही दिवसापूर्वी हे व्हिडिओ पोलीस आयुक्तांच्या समोर आले. त्यांनी शहरात ड्राईव्ह सुरू केला. गेल्या दोन दिवसात पुंडलिक नगर भागात छापेमारी झाली. पोलिसांनी कारवाई करत नशेचा साहित्य विकणाऱ्या 51 वर्षीय अनिल माळवेला अटक केली आहे.

कोण आहे हा अनिल मावळे?

माळवे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याच्या नावावर तब्बल 16 गुणे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत. जुगार अड्डा चालवणे, रॉबरी करणे, गांजा विकणे,  घरफोड्या करणे हा त्याचा धंदा आहे. शहरातील कुंडलिक नगर भागात राहतो. उच्चभ्रू पोरांना गाठून हवा ते ते आणि हव्या तेवढ्या प्रमाणात नशेचे साहित्य देत असे.

स्वतःजवळ कमी प्रमाणात अंमलीपदार्थ ठेवत असे जेणेकरून पकडला गेला तरी अधिकची कारवाई होऊ नये. शहरातील N3 N4 भागातील उच्चभूमी भागातील अनेक तरुणांना त्यांनी आपल्या जाळ्यात ओढलं. काही दिवसांपूर्वी दौलताबाद येथे मोठी पार्टी झाल्याची पोलिसांनी माहिती मिळाली. या सगळ्या प्रकारची ज्यांनी तक्रार केली त्यांनी काय म्हटलं आपण पाहुयात.

छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढत चाललेल्या नशेखोरीबद्दल कालच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहात प्रश्न मांडला. पोलीस आयुक्तांनी कारवाईला सुरुवात केली आहे. नशेखरित्या जाळ्यात तरुण कसे अडकत जातात याचे हे वास्तव आहे. पूर्वी हे सर्व पुणे-मुंबईत असायचं, मात्र हे छत्रपती संभाजी नगरपर्यंत पोहोचले आणि हे उद्याची पिढी उध्वस्त करणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT