Chhatrapati Sambhajinagar News Saam TV
महाराष्ट्र

Petrol Theft: इंधनाची टंचाई भासताच चोरट्यांचा सुळसुळाट; दुचाकीतील पेट्रोल अज्ञात चोराने पळवलं, पाहा VIDEO

Petrol Theft Viral Video: पेट्रोल-डिझेल मिळत नसल्याने चोरीच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात पेट्रोल चोरीच्या घटना वाढल्या आहेत.

Satish Daud

Chhatrapati Sambhajinagar Petrol Theft News

एकीकडे ट्रक चालकांचा संप असल्याने राज्यातील अनेक शहरांमधील पेट्रोल पंप कोरडे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच पेट्रोल-डिझेल मिळत नसल्याने चोरीच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात पेट्रोल चोरीच्या घटना वाढल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकींमधून चोरटे पेट्रोलवर डल्ला मारत आहेत. शहरातील औरंगपुरा भागात उभ्या असलेल्या एका दुचाकीमधून चोरट्याने पेट्रोलची चोरी केली आहे. मंगळवारी रात्री घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

देशभरासह राज्यातील ट्रक चालकांनी संपाची हाक दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी दुचाकीच्या टाक्या फुल करुन घेतल्या होत्या. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील अनेक पेट्रोल पंपावर इंधनाचा ठणठणाट आहे.

सगळीकडे नो स्टॉकचे बोर्ड लागले आहेत. अशातच दुचाकीमध्ये भरून ठेवलेल्या पेट्रोलवर चोरटे डल्ला मारत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की परिसरात उभ्या असलेल्या दुचाकीजवळ हळूच एक तरुण येतो.

आधी बनावट चावीने हा तरुण स्कूटीची डिक्की उघडतो. यानंतर त्यातील पेट्रोल एका नळीच्या साह्याने सोबत आणलेल्या कॅन मध्ये भरतो. पेट्रोलची चोरी झाल्यानंतर सदरील तरुण घटनास्थळावरून पसार होतो. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पेट्रोल चोरीच्या घटनेमुळे संभाजीनगरकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुण्यात शासनाची फसवणूक, ४६ बोगस दिव्यांग शिक्षकांची नावं समोर; कारवाईची टांगती तलवार

Maharashtra Weather : राज्यात थंडीची लाट, जळगावात तापमान १२.६ अंशांवर; इतर ठिकाणी काय स्थिती? | पाहा VIDEO

Mumbai Local: नवी मुंबईत धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू, तोल गेला अन् रूळावर पडला

Konkani Sweet Dishes : कोकण स्पेशल वडे; 'या' फळाचा करतात वापर, घरी एकदा ट्राय कराच

Maharashtra Live News Update: राजकीय गुंडांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा आता खंडणी वसूल करणाऱ्या गुंड आणि अवैध सावकारांकडे

SCROLL FOR NEXT