chhatrapati sambhaji nagar news minister abdul sattar pa and supporters beaten social worker in sillod  Saam TV
महाराष्ट्र

Sillod News: सामाजिक कार्यकर्त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण; मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पीएसह ५ जणांविरोधात गुन्हा

Abdul Sattar Sillod News: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांचा पीए आणि समर्थकांनी एका सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली आहे.

Satish Daud, डॉ. माधव सावरगावे

Minister Abdul Sattar Sillod News

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांचा पीए आणि समर्थकांनी एका सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली आहे. ही घटना सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात मंगळवारी घडली आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पीएसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

तर शिवीगाळ केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याविरोधातही सिल्लोड शहर (Sillod City) पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश शंकरलाल शंकरपेल्ली (रा. शास्त्रीनगर, सिल्लोड) असं मारहाण झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश शंकरलाल शंकरपेल्ली यांनी सिल्लोड शहरातील सर्व्हे नंबर ९२ मधील फेरफारावर आक्षेप घेतला होता. या आक्षेपाविरोधात मंगळवारी तलाठी भवन कार्यालयात सुनावणी होती. सुनावणी संपल्यानंतर महेश शंकरलाल शंकरपेल्ली कार्यालयातून बाहेर पडत होते.

शाकेरमियाँजानी, मंत्री अब्दुल सत्तार यांचे (Abdul Sattar) पीए बबलू चाऊस, बबलू जब्बार पठाण, शेख अब्दुल बाशीद शेख सादिक व अकील बापू देशमुख (सर्व रा. सिल्लोड) यांच्यासह इतर लोकांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत महेश शंकरपेल्ली यांना दुखापत झाली.

दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर महेश शंकरपेल्ली यांनी तातडीने पोलिसांत (Police) धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार सिल्लोड शहर पोलिसांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पीएसह इतर ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर महेश शंकरपेल्ली यांच्यावर देखील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

SCROLL FOR NEXT