jayakwadi water level today Saam TV
महाराष्ट्र

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ; आता किती टक्के भरलं धरण? पाहा आजची आकडेवारी

Jayakwadi Dam Water Level : मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण शंभरीकडे वाटचाल करीत आहे.

डॉ. माधव सावरगावे

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात मुसळधार पाऊस झाला. नाशिक अहमदनगरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण शंभरीकडे वाटचाल करीत आहे.

पाटबंधारे विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज सकाळी धरणातील पाणीसाठा तब्बल ९५ टक्क्यांवर पोहचला आहे. सध्या धरणात २० ते २१ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू असल्याने आज कुठल्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीत (Godavari River) पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो.

अद्याप त्याबाबत जलसंपदा विभागाकडून कोणताही निर्णय झाला नाही. मात्र जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi Dam Water) खालील गोदावरी नदीकाठावरील गावांनी सतर्क राहावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड, नांदेड आणि अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित तहसीलदारांना पाठविण्यात आले आहे.

जायकवाडी धरणातून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून धरणात मुबलक असा पाणीसाठा जमा झालेला नव्हता. त्यामुळे फेब्रुवारी 2024 पासूनच अनेक शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. छत्रपती संभाजीनगर शहरात 8 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता.

मात्र, आता धरण काठोकाठ भरल्याने हा पाणीपुरवठा 3 ते 4 दिवसांवर येण्याची दाट शक्यता आहे. जायकवाडी धरणाची पाणी साठवण क्षमता १५२२ फूट आहे. सध्या धरणाची पाणी पातळी तब्बल १५२१ फूट झाली आहे. त्यामुळे धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणासाठी ५०० क्युसेक पाणी सोडण्यात आलेले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT