Chhatrapati Sambhaji Nagar News Saam TV
महाराष्ट्र

Sambhaji Nagar News: मुलीच्या प्रेमविवाहास मदत केल्याचा राग; पित्याने मावसभावासह मुलाला कारखाली चिरडलं

Sambhaji Nagar Crime News: प्रेमविवाह करण्यासाठी आपल्या मुलीला मदत केल्याच्या रागातून एका पित्याने दुचाकीवरून जाणाऱ्या मावस भाऊ आणि त्याच्या मुलाला जीपखाली चिरडलं. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झालाय.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhaji Nagar News

प्रेमविवाह करण्यासाठी आपल्या मुलीला मदत केल्याच्या रागातून एका पित्याने दुचाकीवरून जाणाऱ्या मावस भाऊ आणि त्याच्या मुलाला जीपखाली चिरडलं. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झालाय. थरकाप उडवणारी ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरात गुरुवारी (ता. २८) दुपारच्या सुमारास घडली.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. सचिन वाकचौरे असं संशयित आरोपीचं नाव आहे. तर पवन शिवराम लोढे (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे.

या घटनेत पवनचे वडील शिवराम लोढे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन याच्या मुलीने काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला होता. (Latest Marathi News)

मुलीच्या प्रेमविवाहाला मावस भाऊ आणि त्याच्या मुलानेच मदत केल्याचा संशय आरोपीच्या मनात होता. या संशयातून त्याने शेंदूर वाडा ते सावखेडा रस्त्यावर दुचाकीवरून निघालेल्या मावस भाऊ आणि त्याच्या मुलाला जीपने उडवलं.

धक्कादायक बाब म्हणजे, तरुण खाली पडल्यानंतर आरोपीने त्याच्या अंगावर चार वेळा बोलेरो कार घालून त्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर विधान परिषद निवडणूक, मुंबई उच्च न्यायालयात काँग्रेस दाद मागणार

Women Rights : विवाहित मुलींनाही मिळणार योजनांचा लाभ; सुप्रीम कोर्टाच्या ५ महत्त्वाच्या टिप्पण्या

Fire Death: अग्नितांडव! ५ मजली रेस्टॉरंट आगीत भस्मसात; २० जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

'या' फोटोतील हिरोईनला ओळखलं का? चित्रपटसृष्टीत हक्क गाजवतेय...

Deool Band 3 : स्वामी थेट अमेरिकेत पोहचणार, राघव शास्त्रीला भेटणार अन्...; 'देऊळ बंद ३' ची कथा काय? प्रवीण तरडेंनी दिली हिंट

SCROLL FOR NEXT