Kannad Taluka Manora Village Saam TV
महाराष्ट्र

Sambhajinagar News: पती देशसेवेसाठी सीमेवर, ९ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा विहिरीत पडून मृत्यू, दुर्दैवी घटना!

Kannad Taluka News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक भयानक घटना घडली. कन्नड तालुक्यातल्या मोहरा येथे एका २२ वर्षीय गर्भवती महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला.

Satish Daud

रामू ढाकणे, साम टीव्ही | छत्रपती संभाजीनगर २८ जानेवारी २०२४

Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक भयानक घटना घडली. कन्नड तालुक्यातल्या मोहरा येथे एका २२ वर्षीय गर्भवती महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. पल्लवी दिनेश गाडेकर असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत पल्लवी यांचे पती दिनेश गाडेकर हे सैन्यदलात आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांचे कुटुंब हे मोहरा शिवारात डोंगराच्या पायथ्याशी राहत होते. पल्लवी ९ महिन्यांच्या गर्भवती होत्या. (Latest Marathi News)

शनिवारी (२७ जानेवारी) दुपारच्या सुमारास पल्लवी घराबाहेर पडल्या. मात्र, खूप वेळ होऊनही त्या परतल्या नाही. कुटुंबियांनी शोधाशोध घेतली असता, त्यांचा मृतदेह राजेंद्र गाडेकर यांच्या गट नंबर १५० मधील विहिरीत मृतदेह आढळून आला.

दरम्यान, पल्लवी यांच्या मृत्यूची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थली धाव घेत पल्लवी यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT