Chhatrapati Sambhaji Nagar Saam TV
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar Crime: रात्री अंगणात झोपताना सावधान! आईच्या कुशीतून पळवलं बाळ

Crime News: आई गाड झोपेत असल्याने आपल्या बाळाला कोणी आपल्यापासून दूर नेणार आहे याची तिचा काहीच कल्पना नव्हाती.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर येथे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित राहिला आहे. बाळ पळवणाऱ्या टोळक्यातील एकाने आईच्या कुशीत झोपलेल्या बाळावर पाळत ठेवली. बाळाची आई त्याच्या शेजारी नसताना त्याला बाळाचे अपहरण करायचे होते. आई गाड झोपेत असल्याने आपल्या बाळाला कोणी आपल्यापासून दूर नेणार आहे याची तिचा काहीच कल्पना नव्हाती.

चिमुकली मुलगी आणि तिची आई रात्री अंगणात झोपल्या होत्या. आकाशात दिसणारा चांदोबा, चांदण्या दाखवत आई आपल्या चिमुकल्या मुलीला गोष्टी सांगत होती. अंगाई गाऊन आईने बाळाला झोपवलं. बाळ शांत झोपलेलं पाहून आईचा देखील डोळा लागला. यावेळी हा संपूर्ण प्रकार झाडीमागे दडून बसलेला चोर पाहत होता.

आईचा डोळा लागताच त्याने आपला डाव साधला. आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाला घेण्यासाठी तो पुढे आला. त्याने आजुबाजूला पाहिलं. रस्ता मोकळा दिसताच त्याने चिमुकलीवर झडप घातली. चिमुकल्या मुलीला उचलताच तिने रडायला सुरुवात केली. बाळाच्या रडण्याने आईदेखील पटकन उठली. तिने पाहिलं आपल्या शेजारी आपल्या काळजाचा तुकडा नाही. कोणीतरी आपलं बाळ घेऊन पळत आहे.

ही दृश्य पाहून आईच्या पायाखालची जमीन सरकली. तिने आरडाओरडा केला. पत्नीचा आवाज ऐकून पती देखील धावत तेथे आला. चिमुकलीला पळवून नेताना वडिलांनी त्या चोरट्याचा पाठलाग केला. मात्र नराधम बाळाला घेऊन पळत सुटला. बाहेर काही तरी गडबड सुरु आहे असं समजून गावातील इतर व्यक्ती देखील बाहेर आल्या.

आपला डाव फसल्याचं लक्षात येताच चोरट्याने चिमुकल्या मुलीला खाली फोकून दिलं. रस्त्याच्या कडेला चिमुकली पडली. यामध्ये चिमुकलीला किरकोळ जखम झाली असून तिच्यावर उपचार करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. शहरातील एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अपहरण करता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: लातूरच्या अहमदपूरमधून जाणाऱ्या मन्याड नदीला पूर

Pune Accident: गणपतीच्या बुकिंगसाठी गेले असता भयंकर घडलं, ट्रकने ११ वर्षांच्या मुलीला चिरडलं; अपघाताचा थरारक VIDEO

Pune : पुण्यातील शाळेत अश्लील डान्स, अंगविक्षेप करत तरुणीनं लगावले ठुमके, Video Viral

Election Commission : आयोगाला पत्रकार परिषद भोवणार? व्होट चोरीचा मुद्दा महाभियोगापर्यंत जाणार?

Maharashtra Government: शेतकऱ्यांना मिळणार गुड न्यूज: बळीराजासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT