chhagan mhetre, MLA Sanjay Gaikwad , Shivsena, Uddhav Thackeray , Eknath Shinde saam tv
महाराष्ट्र

'झोपडपट्टीची दादागिरी आमच्या पुढं नकाे, आम्ही बांगड्या भरल्या नाहीत'; आमदार गायकवाडांना सेनेचं प्रत्युत्तर

भविष्यात बुलढाणा जिल्ह्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट हा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संजय जाधव

Buldhana News : आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत. आमच्या नादाला लागू नकोस. गायकवाड तुम्ही चार लाखाचे नेतृत्व करित आहात चून चून के मारेंगे हे शिवसेनेला (shivsena) शिकवू नकोस, तू या राज्यातील अनेकांना डिवचलं आहेस, लक्षात ठेव अशा एकेरी भाषेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या गटातील बुलढाणा जिल्हा संघटक छगन मेहेत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी घेतला. आमदार गायकवाड यांनी नुकतेच चून चून के मारेंगे अशी धमकी ठाकरे गटास अप्रत्यक्ष दिली हाेती. त्यास ठाकरे गटानं प्रत्युत्तर दिलं आहे.

बुलढाणा येथील बाजार समितीच्या सभागृहात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे (Eknath Shinde) गटाच्या कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला. त्याचे समर्थन आमदार संजय गायकवाड यांनी केले. तसेच शिवसैनिकांना एक प्रकारे धमकीच दिली.

या धमकीस ठाकरे गटाच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी सध्या तरी शाब्दिक प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला आहे. जिल्हा संघटक छगन मेहेत्रे म्हणाले चून चुन के मारेंगे, गिन गिन के मारेंगे या आमदार संजय गायकवाड यांच्या धमकीला आम्ही जशास तसे उत्तर देऊ, आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत. आमच्या नादाला लागाल तर...., एकंदरीतच मेहेत्रे आणि ठाकरे गटाचे समर्थक आमदार गायकवाडांवर भडकल्याचे दिसून आले.

मेहेत्रे पुढं म्हणाले गायकवाड तुम्ही चार लाखाचे नेतृत्व करित आहात. चून चून के मारेंगे हे शिवसेनेला शिकवू नको. तु या राज्यातील अनेकांना डिवचले आहे. माजी आमदार विजयराज शिंदेना मारहाण केली, वारकऱ्यांना अपशब्द बोलून धमक्या दिल्या, मागास्वर्गीया विरुद्ध 10 हजाराची फौज होती तलवारी हातात घेऊन उतरू, असे अनेकादा दादागिरी केली आहे. आता आम्हीही थांबणार नाही. जशास तसे उत्तर देऊ, लक्षात ठेव !

जिल्हा संपर्क प्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर यांनी देखील आमदार गायकवाड यांचा समाचार घेत आमदार गायकवाड यांचा आम्ही फक्त प्रचार नाही तर वर्गण्या जमा करून निवडून आणलं ते काय आम्हांला चून चून के व गिन गिन के मारणार. जसं पेराल तसं उगवेल. ही झोपडपट्टीची दादागिरी आहे, आम्हीही त्यास जशास तसे उत्तर देऊ असे म्हटले.

हर्षवर्धन सपकाळ (माजी आमदार काँग्रेस) म्हणाले या बुलडाणा जिल्ह्यात काय चाललंय, जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंदे, दादागिरी, मारहाण, सर्व दहशत पसरविण्याचं काम होतय. याला जबाबदार पोलीस प्रशासन आहे. पोलीस खात देखील यास पाणी घालतंय. बुलडाण्याची संस्कृती शांततामय असून आज पर्यंत अस कधीही घडलं नव्हतं आता अलीकडच्या काळात क्राईम वाढत चाललाय हे कुठंतरी थांबल पाहिजे अन्यथा अराजकता व दादागिरी यात जनता होरपळली जाईल अशी भिती सपकाळ यांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Attack: पाकिस्तानी सैन्यांवर बलूच आर्मीकडून मोठा हल्ला, मेजरसह ४ जवानांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: सारथी विद्यार्थ्यांनी घेतली विखे पाटील यांची भेट

India Tourism : थंड हवा, धबधबे, हिरवीगार वनराई; भारतातील 'या' हिल स्टेशनची बातच न्यारी

Tuesday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, सासरवाडीकडून धनयोगाचा लाभ दिसतोय; ५ राशींच्या लोकांना सुख समृद्धी मिळणार

Dry Potato Bhaji: नवरात्रीच्या उपवासासाठी बनवा स्वादिष्ट आणि चविष्ट बटाट्याची सुकी भाजी, जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT