'चून चून के मारेंगे...,' शिंदे गटातील आमदाराची ठाकरे गटाला धमकी; पाहा Video

काल बुलढाण्यात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.
Eknath Shinde Uddhav Thackeray
Eknath Shinde Uddhav Thackeray Saam TV

बुलढाणा: काल बुलढाणा येथील बाजार समितीच्या सभागृहात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला. या संदर्भात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी या राड्याचं समर्थन करत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना धमकीच दिली आहे.

काल बुलढाण्यात (Buldhana) शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर आमदार गायकवाडांनी (MLA Sanjay Gaikwad) विरोधी गटाच्या लोकांना धमकी दिली आहे. मात्र, धमकी देताना त्यांनी ज्या हिंदी शब्दांचा वापर केलाय त्याचीच जास्त चर्चा आता जिल्हाभर होत आहे.

पाहा व्हिडीओ -

'शिवसेना (Shivsena) के लोग पातळी छोडकर बात कर रहे हैं। आज तो राडा बहोत कम हो गया, पोलीस ने रोख लिया, उनको पता नही है की, संजय गायकवाड और उसके कार्यकर्ता कितने पागल है। ये आग्या मोहोळ की तरह डसनेवाले कार्यकर्ता है।

अगर वो खवल जाते तो किसीके बाप को बाप समजते नही। अगर इसके बाद इन्होंने कूच भानगड करने का प्रयास किया तो चुन चुन के मारेंगे, गिन गिन के मारे जायेगे।' अशा हिंदी भाषेत गायकवाड यांनी आपल्या शैलीत शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे.

Eknath Shinde Uddhav Thackeray
Wardha: जन्मदात्या बापानेच केली पोटच्या मुलांची हत्या; स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल

दरम्यान, काल जो राडा झाला तो योग्यच होता याचे मी समर्थन करतो आता या पुढे उद्धव गटातील कोणीही बोलले की, त्यांना चोपच देणार आहे. अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिल्यामुळे भविष्यातही जिल्ह्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट हा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com