आम्हांला त्याची भीती वाटते, पाेलीस सरंक्षण द्या ! हल्ल्यानंतर नगरपंचायत उपाध्यक्षांसह पत्नीची मागणी

या घटनेचा पाेलीस कसून तपास करीत आहेत.
Bhandara Crime News
Bhandara Crime NewsSaam TV

Bhandara : मोहाडी नगरपंचायत उपाध्यक्षांवर हल्ल्याचा प्रयत्न नुकताच झाला. हा हल्ला करण्याचा प्रयत्न फसल्याने उपाध्यक्ष बजचावले. पोलिसांनी (police) संबंधितांकडून हत्यार जप्त केले आहे. या प्रकरणाची सखाेल चाैकशी सुरु आहे.

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथील नगरपंचायत उपाध्यक्ष शैलेश गभने यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवलेल्या तलवारीसह चार प्रकारचे हत्यार मोहाडी पोलिसांनी जप्त करून संशयित आरोपीला अटक (arrest) केली. दरम्यान संबंधित संशयितास जामीन मिळाल्याने पुन्हा माझ्या जिवाला धोका असल्याचा दावा नगरपंचायत उपाध्यक्ष शैलेश भने व त्यांच्या पत्नीनं पत्रकार परिषदेत घेऊन केला आहे. तसेच परिवारास पाेलिस सरंक्षणाची मागणी केली आहे.

Bhandara Crime News
Ganeshotsav 2022 : हिंदू महासभेचे विराेध, युवकांची हुल्लडबाजी,पाेलिसांची कृपा; सपना चौधरी थिरकली 'निर्विघ्न'

या घटनेबाबतची अधिक माहिती अशी : आशिष चकोले हा इंदिरा वॉर्डात वडिलांसोबत मोहफुलाची अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करतो अशी चर्चा आहे. त्याच्या घरासमोरून जाण्या-येण्याचा मार्ग अरुंद असल्याने व नेहमी दारुड्यांची गर्दी राहत असल्याने महिलांना तेथून जाण्या- येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. जवळपास 40 ते 50 महिला, पुरुषांनी लेखी निवेदन देऊन दारू व्यवसाय बंद करण्याची मागणी केली होती. त्यामुळे शैलेश गभने यांनी मोहाडी पोलिसांना सूचना देऊन त्याचा व्यवसाय बंद पाडला होता.

याचा राग मनात धरून आशिषने उपाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला करण्याची तयारी केली हाेती. मात्र हत्यारे घरासमोरील गिट्टीच्या ढिगाऱ्यात लपविताना उपाध्यक्षांच्या पत्नीला दिसल्याने त्यांनी तशी कल्पना पाेलिसांनी दिली. आशिषने लपवून ठेवलेले हत्यार पोलिसांनी जप्त केले. जर तो लपवत असलेले हत्यार लक्षात आले नसते तर रात्रीला मारण्याची शक्यता होती, अशी भीतीही गमने यांनी बोलून दाखविली आहे.

परंतु आशिष याला मोहरा बनविण्यात आला असून, त्याच्या पाठीमागे कर्ता दुसराच व्यक्ती आहे. त्या व्यक्तीच्या विरोधात न्यायालयात साक्ष दिली होती, असेही गभने यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Edited By : Siddharth Latkar

Bhandara Crime News
पोषण आहारात अळ्या, सोंडे आढळल्यानं पालकांनी काढला शाळेवर माेर्चा (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com