छगन भुजबळ SaamTV
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी हालचाली, अजितदादांच्या विश्वासू नेत्यानं घेतली भेट

Chhagan Bhujbal News : मंत्रिपद न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ नाराज आहेत. अजितदादांकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजित पवार यांच्या विश्वासू व्यक्तीनं त्यांची भेट घेतली.

Namdeo Kumbhar

Maharashtra Cabinet expansion : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. भुजबळ शपथविधी सोहळ्याला नागपूरमध्ये होते, तरीही त्यांनी राजभवनातील शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चेनं जोर धरला. छगन भुजबळ यांच्यासह दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, धर्मरावबाबा आत्रम यांनाही मंत्रि‍पदाने हुलकावनी दिली. पण महाराष्ट्राच्या राजकारणात छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चेनं जोर धरला. भुजबळांकडून नाराजी असल्याचे दिसूनही आले. आता त्यांच नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

राष्ट्रवादी कॅाग्रेसकडून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याची प्रयत्न सुरू झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांनी आपल्या विश्वासू व्यक्तीला त्यांच्याकडे पाठवले. अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी अजित पवारांचे निकटवर्ती प्रमोद हिंदुराव हे छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी गेले होते. दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळांना केंद्रात महत्वाची जबाबदारी देण्याबाबत चर्चा आहे.

भुजबळ विधानभवनाकडे रवाना होताना साम टीव्हीकडून त्यांच्याशी संपर्क साधला. साम टीव्हीशी बोलताना भुजबळांची नाराजी दिसून आली. वरिष्ठांशी काही बोलणं झालं का? या प्रश्नावर कोण वरिष्ठ मनात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. अजित परांशी बोलणं झालं का? असा प्रश्न विचारला असता त्यावर मात्र त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही.

हसन मुश्रीफ काय म्हणाले ?

छगन भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत. आम्ही सगळे त्यांना भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू. आमच्या वरिष्ठांनी त्यांच्याबद्दल काय करायचं हे ठरवलं असेल, असं मला वाटतं, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

छगन भुजबळ नाराज नाहीत. ते आमचे सगळ्यांचे नेते आहेत, वरिष्ठ त्याबाबत योग्य निर्णय घेतील. भुजबळांबाबत वरीष्ठांचा निर्णय आहे, असे मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले.

सुप्रिया सुळेंनी ठेवलं वर्मावर बोट -

भुजबळ हे जरी नाराज असले तरी, हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. पण ते जेव्हा शरदचंद्र पवार गटात होते. तेव्हा त्यांचा आम्ही यथोचित सन्मान केला. तसेच त्यांची जागा नेहमी शरदचंद्र पवार यांच्या शेजारी असायची. दीड ते दोन वर्षात जे काही झालं त्यात मला पडायचं नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT