Chhagan Bhujbal on Sharad Pawar Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "त्यावेळी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो"

Satish Daud

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडत आहेत. पक्षफुटीनंतर राजकीय नेत्यांकडून मोठमोठे गौप्यस्फोट देखील केले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथे माध्यमांसोबत बोलताना एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

"मी जर शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत गेलो नसतो, तर १९९९ मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो. काँग्रेसने मला त्यावेळी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती", असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे.

माध्यमांसोबत बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, "ज्यावेळी १९९५ मध्ये आमचं सरकार गेलं. त्यावेळी शरद पवार यांनीच मला एमएलसी आणि विरोधी पक्षनेता केलं होतं. त्यावेळेला मी भाजप-शिवसेना सरकारविरोधात विरोधीपक्ष नेता म्हणून काम केलं".

"तेव्हा माझ्या घरावर हल्ला झाला होता. पण मी 'वन मॅन आर्मी' म्हणून लढलो होतो. तेव्हा आम्ही काँग्रेसमध्ये होतो. पक्ष फुटला नसता तर मला खात्री आहे. मी १०० टक्के मुख्यमंत्री झालो असतो."

"शरद पवार यांना ज्यावेळी काँग्रेसमधून बाहेर काढलं गेलं. काँग्रेस पक्ष ज्यावेळी फुटला. त्यावेळी मी सुद्धा शरद पवारांसोबत गेलो होतो. तुम्ही पवारांसोबत जाऊ नका, असं काँग्रेसमधील अनेक दिग्गजांनी मला सांगितलं होतं".

"काँग्रेस तुम्हाला पुढच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करेल, असे मला अनेक फोन-मॅसेज आले होते. पण मी त्यांना सांगितलं की, मी शरद पवार साहेबांसोबत आहे", असंही भुजबळ म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

SCROLL FOR NEXT