Raosaheb Danve : भाजप ४०० हून अधिक जागा जिंकणार, काळ्या दगडावरची पांढरी रेघ; रावसाहेब दानवेंना विश्वास

Raosaheb Danve on Lok Sabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा मिळतील यात कोणतीच शंका नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
Raosaheb Danve on Lok Sabha Election 2024 Result
Raosaheb Danve on Lok Sabha Election 2024 ResultSaam TV

लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा मिळतील यात कोणतीच शंका नाही, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात देखील महायुतीला ४५ पेक्षा जास्ता जागांवर विजय मिळणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

Raosaheb Danve on Lok Sabha Election 2024 Result
Sanjay Raut News: एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा विरोध होता; संजय राऊतांचा खळबळजनक दावा!

वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर माध्यमांनी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमताचा आकडा गाठणार, असं रावसाहेब दानवेंनी म्हटलंय.

राजकारणात काही होऊ शकतं. इंडिया आघाडीला संख्याबळ मिळाले नाही तर काय करणार, असा सवाल पत्रकारांनी रावसाहेब दानवे यांना विचारला. यावर उत्तर देताना, आम्हाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही, असं दानवेंनी म्हटलं आहे.

आम्ही तर त्यांना पाठिंबा मागितलेला नाही. आम्हाला त्यांची गरज पडणार नाही. आमच्या ४०० हून अधिक जागा नक्कीच मिळणार, असा विश्वासही रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार रिंगणात उतरवणार, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली. यावर बोलताना देशात लोकशाही आहे. त्यामुळे मनोज जरांगे व त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, असं दानवे यांनी म्हटलंय.

देशातील मतदार राजा हुशार आहे. विधानसभेला उभे राहिले तर त्यावेळेस लोक ठरवतील. जनता कोणाला पाठिंबा देते हे पाहावे लागेल असं ही त्यांनी नमूद केले. आरएसएस आणि भाजप कधीच वेगळं होऊ शकत नाही. आरएसएसची आमची मातृ संस्था आहे, असंही दानवेंनी स्पष्ट केलंय.

Raosaheb Danve on Lok Sabha Election 2024 Result
Sharad Pawar News: '...म्हणून २००४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची संधी सोडली'; छगन भुजबळांचे नाव घेत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com