Chhagan Bhujbal at Nagpur OBC meet questioning Sharad Pawar over OBC reservation. saam tv
महाराष्ट्र

OBC Reservation: ''आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळ यांचा शरद पवारांना सवाल

Chhagan Bhujbal Slams Sharad Pawar: जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावली जाते. तेव्हा शरद पवार का गैरहजार राहतात, असा प्रश्न भुजबळ यांनी केलाय. नागपूरमधील ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते.

Bharat Jadhav

  • नागपूर ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळांनी शरद पवार यांना सणसणीत सवाल केलेत.

  • आम्ही आमच्या आरक्षणासाठी लढायचं नाही का? भुजबळांचा सवाल.

  • हायकोर्टाने मराठा आरक्षण निर्णयाविरोधातील जनहित याचिका फेटाळली.

मुंबई हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल झालेली जनहित याचिका फेटाळून लावली. त्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत सणसणीत सवाल केलेत. आम्ही आमचा आरक्षण वाचवण्यासाठी पुढे यायचे नाही का? असा सवाल त्यांनी नागपूरमधील ओबीसी मेळाव्यातून केला.

नागपूरमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा पार पडला यात मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल चढवत त्यांना प्रश्न केलेत. आपण शिवसेना सोडून शरद पवार यांच्यासोबत आलो, कारण मंडल कमिशनसाठी आणि तुम्ही मंडल कमिशन लागू केलं, त्याबाबद्ल त्याचे आभार, पण आमचं आरक्षण जात असेल, तर आम्ही बोलायला नको का? मंडल आयोग येईपर्यंत सरकार आपापल्या पद्धतीने आरक्षण देत होतं. पण आता आम्ही ओबीसीच्या आरक्षणासाठी लढायचे नाही का, असा सवाल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना केला.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावरून भुजबळ म्हणाले की, मराठा एक जात असेल पण ओबीसी ३७४ जाती आहेत. त्यामुळे प्रत्येक जातींचे नुकसान होणार आहे. आम्ही कुणबी, माळी ,वंजारी समाजाच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल केलीय. दोन-चार दिवसात त्याच्यावर सुनावणी होईल. राजकीय आरक्षण अघोषित आहे, त्या ठिकाणी मराठा समाज पुढारलेला आहे, म्हणून सुप्रीम कोर्टाने मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांना ईडब्ल्यूएसमधून आरक्षण देण्यात आलं.

ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?

मविआचं सरकार होतं तेव्हापासून मराठा समिती अस्तित्वात होती. त्यावेळी त्यांचे मार्गदर्शक शरद पवार होते. त्यात राष्ट्रवादीच्या बाजूने अजित पवार आणि जयंत पाटील होते. शिवसेनेच्या वतीने शिंदे आणि सुभाष देसाई काँग्रेसच्या बाजूने बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण होते. त्यावेळी शरद पवार बोलले नाहीत. शरद पवार म्हणत आहेत की, दोन समित्यांमध्ये समतोल असावा.

मराठा समिती आहे त्याच्यात इतर समाजाचे लोक आहेत. तर त्यात कोण आहेत? गिरीश महाजन आणि ओबीसी समितीमध्ये कोणी नाही. मग आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का? असा सवाल भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT