Chhagan Bhujbal Saam Digital
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे बडे नेते पवार गटात जाणार; छगन भुजबळ यांनी सांगितलं विधानसभेचं नेमकं गणित

Maharashtra Politics : महायुतीतून तिकीट नाही मिळालं तर महाविकास आघाडीत मिळणार आणि महाविकास आघाडीत नाही मिळालं तर महायुतीतून मिळणार असल्याच छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Sandeep Gawade

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोठे दोन नेते शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर आज मंत्री छगन भुजबळ यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत तीन तीन पक्ष आहेत. महायुतीतून तिकीट नाही मिळालं तर महाविकास आघाडीत मिळणार आणि महाविकास आघाडीत नाही मिळालं तर महायुतीतून मिळणार असल्यांच म्हटलं आहे.

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

पत्रकारांनी आज अजित पवार गटाचे दोन बडे नेते राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा आहेत, त्याबाबत छगन भुजबळ यांनी विचारलं असता, आपल्याला त्याबाबत माहिती नाही. मात्र इकडे तीन पक्ष, तिकडे तीन पक्ष आहेत. दोघांना तिकीट मिळणार, एक इकडून एक तिकडून. ज्यांना तिकिटे नाही मिळणार ते इकडून तिकडे ते तिकडून इकडे जाणार. इकडे पण आयाराम गयाराम तिकडे पण आयाराम गयाराम होणार. त्याच्यामध्ये फार असे काही नावीन्य नाही. एखादा पक्षाच्या वाट्याला ती जागा येते पण त्यांच्याकडे उमेदवार योग्य नसेल तर दुसरीकडील इच्छुक उमेदवार असेल त्याला उमेदवारी दिली जाईल.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची साखर पट्टा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठी दाकद आहे. पक्षफूटीनंतर अजित पवारांसोबत अनेक आमदार गेले आहेत तर शरद पवारांकडे केवळ काहीच आमदार आहेत. पक्षाची बिघडेली ही घडी बसवण्यासाठी आणि राजकीय वारसा पुन:स्थापित करण्यासाठी शरद पवार या वयातही मतदारसंघ पिंजून काढत आहेत. नवीन चोहऱ्यांचा शोध घेत आहेत. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यामुळे महायुतील पक्षातून मोठं इनकमिंग सुरू झालं आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील यांच्या सारखे बडे नेते गळाला लागले. त्यामुळे भाजपसह महायुतीतील पक्षांनी धास्ती घेतली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी पक्षात झालेल्या फुटीमुळे पवारांसाठी पर्यायांची संधी वाढली आहे. जेव्हा बहुतेक आमदारांनी अजित पवारांसोबज जाणं पसंत केलं, त्यावेळी नवीन चेहऱ्यांचा शोध घेण्याची संधी मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT