Chhagan Bhujbal  Saam Tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही, समर्थक आक्रमक; बुलडाणा आणि नाशिकमध्ये रास्तारोको आंदोलन

maharashtra cabinet expansion: छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे रस्तारोको आंदोलन सुरू केले आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

Priya More

महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवार पार पडला. मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे महायुतीमधील अनेक नेते नाराज झाले आहेत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे समर्थक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. बुलडाणा आणि नाशिकमधील ओबीसीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी रास्तारोको आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे.

छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे रस्तारोको आंदोलन सुरू केले आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. अर्धा तास रास्तारोको आंदोलन केल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा भुजबळ समर्थकांनी दिला आहे.

नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे भुजबळ समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी येवला- लासलगाव विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील विंचूर येथे छत्रपती संभाजीनगर-नाशिक राज्य मार्गावर अर्धा तासाच्या जवळपास रस्ता रोको आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

छगन भुजबळ यांना मंत्रीपद द्यावे तसेच पक्षात त्यांचा संबंध राखला जावा यासाठी भुजबळ समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयासमोर भुजबळ समर्थकांनी घोषणा देत भुजबळसाहेबांना मंत्री मंडळात न्याय द्यावा अशा घोषणा देत आपला निषेध व्यक्त केलाय येत आहे. भुजबळ समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहे

तर दुसरीकडे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला असून सिंदखेडराजा येथे ओबीसी समाजाच्यावतीने शहरातून मोर्चा काढत नागपूर पुणे या महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा निषेध करत सिंदखेडराजा येथे मोर्चा काढून रास्तारोको करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT