Chhagan Bhujbal On Maratha Reservation Saam tv
महाराष्ट्र

Chhagan bhujbal: शिंदे समिती ताबडतोब बरखास्त करा, भरसभेत भुजबळांनी सरकारला सांगितल्या OBC समाजाच्या मागण्या

Vishal Gangurde

Chhagan bhujbal on Reservation:

हिंगोलीतील ओबीसी मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळांनी आरक्षणाच्या मुद्यावरून उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी सभेत भुजबळांनी जरांगे यांच्यावरही निशाणा साधला. तसेच सभेत हजारो ओबीसी बांधवांना संबोधित करताना भुजबळांनी सरकारला ओबीसी समाजाच्या मागण्या सांगितल्या. तसेच त्यांनी 'शिंदे समिती ताबडतोब बरखास्त करण्याचीही मागणी भुजबळांनी केली. (Latest Marathi News)

छगन भुजबळ ओबीसी मेळाव्यात काय म्हणाले?

हिंगोलीतील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ म्हणाले, 'मराठा समाजाला मतदान केलं नाही म्हणून जाळपोळ केली. गावबंदी केली, तेव्हा पोलीस काही करत नाही. यावर आपल्यालाच काही करावं लागेल. त्यांना दाखवावं लागेल. हम रुके हुये थे, थके हुये नही थे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'तुम्ही एकत्र आले तर काय चमत्कार करु शकता. ग्रामपंचयत निवडणुकीत भाजप आली. ओबीसींचा आवाज बुलंद करा. बैठकीत मला बोलवा किंवा नका. पण आता मला आमदारकीची हौस नाही. मंत्रिपदाची हौस नाही. गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या, पण आमच्यावर बुलडोझर नको, असंही ते म्हणाले.

भुजबळ यांनी सरकारकडे काय मागण्या केल्या?

'सरकारकडून जे सार्थीला मिळालं, ते महाज्योतीला द्या. शिंदे समिती ताबडतोब बरखास्त करा. आधी नोंदी या एक हजार कुणबी नोंदी सापडल्या. आता लाखो सापडत आहेत. दोन महिन्यात मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या. मराठा समाजाचं एकट्याचं सर्वेक्षण चालणार नाही. सर्वांचं सर्वेक्षण करा. मग इतरांपेक्षा मागास असेल तर द्या, अशा मागण्या भुजबळांनी केल्या.

'मंडल आयोगाने सांगितलं की, आम्ही ५४ टक्के आहोत. बावनकुळे, शरद पवार , अजित पवार म्हणत आहेत की, जनगणना करा. एकदाची जनगणना करा. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. बिहार जातनिहाय जनगणना करु शकतो, तर महाराष्ट्र का नाही? असा सवाल देखील भुजबळ यांनी उपस्थित केला.

'ओबीसी समाजासाठी दूरपर्यंत लढाई लढावी लागणार नाही. अभी तो टोली है मुठ्ठीभर जमीन, पुरा आसमान बाकी है, असा इशाराही भुजबळांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Astrology Tips : काही केल्या लग्न जुळत नाहीये? वास्तुशास्त्रात दिलेले 'हे' उपाय एकदा करून तर पाहा

Nashik News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने वसतिगृहातच संपवलं जीवन; धक्कादायक घटनेनं नाशिकमध्ये खळबळ

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

SCROLL FOR NEXT