Chhagan Bhujbal News : मंत्रिपद हुकल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. हिवाळी अधिवेशनात न थांबता छगन भुजबळ नाशिकला परतलेत. पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसला थेट इशाराच दिला. त्याशिवाय कार्यकर्त्यांशी शांतपणे बोलून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यसभा आणि लोकसभेला संधी दिली नाही, त्यावरही त्यांनी बोट ठेवले.
छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झालाय. अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ काय निर्णय घेतात? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. छगन भुजबळ नाशिकला गेल्यावर काय निर्णय घेतात? याकडे राजकीय नजरा लागल्या आहेत.
मंगळवारी पत्रकारांशी बोलताना छगन संतप्त प्रतिक्रिया दिली. तुम्ही उठ म्हणाले की उठायचं, आणि बस म्हणाले की बसायचं, असे ऐकणारा छगन भुजबळ नाही, असे भुजबळ म्हणाले. कार्यकर्त्यांनी माझ्यासमोर त्यांच्या वेदना आणि दुःख मांडले. मी पण त्यांना जे घडले आहे ये सांगितले. मी माझ्या मतदारसंघात आज जातोय. उद्या पुन्हा एक समता परिषेदेची बैठक आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांमध्ये निराशा आहे. सुसंस्कृतपणे आपल्या भावना व्यक्त करा असे सांगितले. जोडे मारो आंदोलन करू नका असे आवाहन मी केलेय , असे छगन भुजबळ म्हणाले.
प्रश्न मंत्रिपदाचा नाही, ज्या प्रकारे अवहेलना केली त्याचा आहे. पक्षाचे प्रमुख निर्णय घेतात, आमच्या पक्षाचे प्रमुख अजित दादा आहेत. लोकसभा निवडणुकीत देखील मला दिल्लीमधून निवडणूक लढण्यासाठी सांगितले होते. एक महिना झाला तरी माझं नाव जाहीर झाले नाही. माझ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटपर्यंत आग्रह धरला होता, असे छगन भुजबळ म्हणाले.
मी 40 वर्षांपासून मी इथे आहे, म्हणून मला राज्यसभा द्या अशी माझी मागणी होती. पण आता मी लढलो आणि आता मला जाण्यासाठी सांगत आहेत. प्रफुल पटेल समीर भुजबळ यांच्या संपर्कात आहेत ते त्यांचायशी बोलत आहेत. तुम्हाला वाटेल तेव्हा मला वरती पाठवणार. वाटेल तेव्हा खाली आणणार, मी तुमच्या हातातला खेळणं आहे का? असा संतप्त सवाल भुजबळांनी उपस्थित केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.