Chhagan Bhujbal  Saam TV
महाराष्ट्र

Chhagan bhujbal: जालन्यात 200 पिस्तूल घेण्यासाठी राजकीय नेत्यांकडून रसद; मंत्री छगन भुजबळांचा खळबळजनक दावा

Chhagan bhujbal Latest News: आज शनिवारी मंत्री छगन भुजबळ यांनी बीड येथील ओबीसी एल्गार मेळाव्यातून जालना आणि बीडमध्ये जाळपोळीच्या घटनेनंतर जालन्यात 200 पिस्तूल आल्या आहेत, असा दावा मंत्री छगन भुजबळांनी केला आहे.

लक्ष्मण सोळुंके

Chhagan bhujbal latest News:

आज शनिवारी मंत्री छगन भुजबळ यांनी बीड येथील ओबीसी एल्गार मेळाव्यातून जालना आणि बीडमध्ये जाळपोळीच्या घटनेनंतर जालन्यात 200 पिस्तूल आल्या आहेत, असा दावा मंत्री छगन भुजबळांनी केला आहे. पिस्तूल घेण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी रसद पूरवल्याचा दावा भुजबळांनी केला आहे.

भुजबळांच्या आरोपादरम्यान गेल्या महिन्याभरात कारवाई करत पोलिसांनी चौदा ते पंधरा पिस्तूल आणि तलावरी जप्त केल्या आहेत. भुजबळांनी सार्वजनिक सभेतून दोन महिन्यात जालन्यात 200 पिस्तूल आल्याचा खात्रीलायक दावा केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

मंत्री भुजबळ यांनी आज शनिवारी बीडमध्ये ओबीसी आरक्षण एल्गार मेळाव्यात उपस्थितांना संबोधित केले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनात झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर बीड आणि जालन्यात मोठ्या प्रमाणात जळपोळ झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

या घटनेनंतर या घटनेला जबाबदार म्हणून गेवराईच्या ऋषिकेश बेदरे याला अटक करण्यात आली होती. ऋषिकेशच्या जवळ गावठी पिस्तूलही सापडले असल्याने त्यांच्यावर आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जरांगे यांच्यावर जाळपोळीचे गंभीर आरोप करताना छगन भुजबळ यांनी जालना जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात 200 पिस्तूल आल्याचा खात्रीदायक दावा केला होता. तसेच काही राजकीय लोक आणि काही जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन निवडून येण्यासाठी नवे नेतेही पिस्तूल घेण्यासाठी रसद पुरवत असल्याचाही गंभीर आरोप भुजबळांनी केला होता.

जिल्ह्यात कुणासाठी पिस्तूल आलेत? कुणासाठी आणले जात आहेत? कुणाला मारणार आहेत ? असे सवाल करत जाहीर सभेतून केले. त्यानंतर या संपूर्ण प्रकारणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी देखील भुजबळ यांनी केली केली.

भुजबळ यांनी केलेल्या दाव्यानुसार जालन्यात 200 पिस्तूल असतील तर ते कुणी आणले? कसे आणले.? कशासाठी आणले, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भुजबळांनी २00 पिस्तूलाची माहिती सार्वजनिक केल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. इतकी मोठी माहिती भुजबळ यांच्या जवळ असताना त्यांनी ही माहिती का लपवली, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.

तत्पूर्वी, छगन भुजबळ यांनी म्हटल्याप्रमाणे पिस्तूल घेण्यासाठी रसद पुरवणाऱ्या नेत्यांना ताब्यात घावी, अशी मागणी आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. मंत्रिपद घेताना संविधानात्मक गोपनीयतेची शपथ घेतलेली असताना पोलिसांना माहिती देण्याऐवजी त्यांनी सार्वजनिक सभेतून 200 पिस्तूलाची माहिती सार्वजनिक केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT