महाराष्ट्र

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange: पुन्हा एकदा छगन भुजबळ विरुद्ध जरांगे संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.. कारण भुजबळांनी जरांगेंना थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान दिलंय.. मात्र हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींचा सामना कसा रंगलाय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • छगन भुजबळ यांनी जरांगेंना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान दिलंय.

  • मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद उफाळला.

  • “तु कोण आहेस रे?” भुजबळांच्या या विधानानं राजकीय वातावरण तापलं.

मराठा आरक्षणावरुन मंत्री छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे संघर्ष टोकाला गेलाय.. त्यातच आता भुजबळांनी रोज रोज टीका करणारा कोण आहे रे तू? असं म्हणत जरांगेंना थेट निवडणुकीत उतरण्याचं आव्हान दिलंय. खरंतर सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियरचा जीआर काढल्यानंतर ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झालाय.

त्यातच विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये ओबीसींनी जीआर रद्द करण्याची मागणी करत एल्गार पुकारला. तर दुसरीकडे 17 ऑक्टोबरला बीडमध्येही ओबीसी भुजबळांच्या नेतृत्वात एल्गार पुकारणार आहेत. या ओबीसी मोर्चावरुन जरांगेंनी वडेट्टीवार आणि भुजबळांवर हल्लाबोल केलाय.मात्र भुजबळांच्या आव्हानावर भाष्य करणं टाळलंय

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत घोषणा करणाऱ्या जरांगेंनी नंतर सामाजिक प्रश्नावरच लढण्याचा निर्णय घेतला.. आता भुजबळांनी थेट निवडणूक लढवण्याचं आव्हान देत जरांगेंच्या जखमेवर मीठ चोळलंय.. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर जरांगे विरुद्ध भुजबळ हा संघर्ष आणखी तीव्र होत जाणार, हे मात्र निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: फेब्रुवारीपासून चमकणार या ३ राशींचं नशीब; 29 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय

Maharashtra Live News Update: शिरपूर उपनगराध्यक्ष पदावर भाजपचे संगिता देवरे यांची निवड

Crime News : बाबा मला मासिक पाळी आलीये...मुलगी विनवण्या करत होती, पण पैशांना हपापलेल्या बापानं सौदा केला, शरीरसंबंध...

"डॅडी इज होम..."; डोळ्यावर गॉगल, एका हातात गन अन् दुसऱ्या हातात सिगार, यशच्या 'Toxic'चा टीझर आऊट; पाहा VIDEO

Pune Nagpur : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे ते नागपूर रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द; कारण काय?

SCROLL FOR NEXT